‘इस प्यार को क्या नाम दूँ -3’ मालिका 6 महिन्यांत गुंडाळणार गाशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 16:54 IST2017-09-06T11:24:32+5:302017-09-06T16:54:32+5:30

छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे. इस प्यार को क्या दूँ 3 या मालिकेच्या फॅन्ससाठी ...

'What is the name of this love' series will be wrapped in 6 months? | ‘इस प्यार को क्या नाम दूँ -3’ मालिका 6 महिन्यांत गुंडाळणार गाशा!

‘इस प्यार को क्या नाम दूँ -3’ मालिका 6 महिन्यांत गुंडाळणार गाशा!

ट्या पडद्यावरील आणखी एक मालिका लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे. इस प्यार को क्या दूँ 3 या मालिकेच्या फॅन्ससाठी एक झटका लागणार आहे. कारण ही मालिका लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या सहा महिन्यांत या मालिकेला गाशा गुंडाळावा लागणार आहे. फोर लायन्स प्रॉडक्शन कंपनी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेची निर्मितीसुद्धा याच कंपनीने केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांत इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेनं टीआरपीमध्ये खराब कामगिरी केली आहे. मालिकेचा टीआरपी वाढण्याऐवजी दिवसेंदिवस घसरत चालला होता. त्यामुळे मालिकेसह निर्मात्यांचं नुकसान होत होतं. त्यामुळे या मालिकेचं शूटिंगही रोखण्यात आलं. अखेर येत्या 15 सप्टेंबरपासून ही मालिका रसिकांचा निरोप घेणार आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता बरुण सोबती यानं या मालिकेच्या माध्यमातून जवळपास तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. या मालिकेत वरुण प्रमुख भूमिका साकारत होता. मात्र छोट्या पडद्यावर सहा महिन्यांपूर्वी आल्यापासून दिवसेंदिवस मालिकेचा परफॉर्मन्स चांगला होण्याऐवजी घसरत चालला होता. त्यामुळेच निर्मात्यांनी मालिकेचा गाशा गुंडाळण्याचं ठरवले आहे. मात्र मालिकेच्या निर्मात्या गुल खान यांनी ही मालिका ऑफएअर होणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. अशा चर्चा आणि बातम्या सुरु असतील तर सुरु राहू द्या, अशा अफवांबद्दल मी काहीच बोलू शकत नाही अशी प्रतिक्रिया गुल खान यांनी दिली आहे.त्यामुळे खरं काय ते काही दिवसांतच समोर येईल.मुळात 'इस प्यार को क्या नाम दूँ'या मालिकेचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता आणि या मालिकेतील सान्या आणि बरुणच्या जोडीचे चांगलेच कौतुक झाले होते. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये सान्या आणि बरुण यांनी काम न केल्याने प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे या मालिकेच्या निर्मात्यांनी तिसऱ्या सिझनमध्ये बरुणला परत आणले. पण तिसऱ्या सिझनमध्ये बरुण आणि सान्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला न मिळणार असल्याने त्यांचे फॅन्स चांगलेच दुःखी झाले  होते. 

Web Title: 'What is the name of this love' series will be wrapped in 6 months?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.