बरुणच्या कमबॅकचे काय झाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 11:28 IST2016-06-25T05:58:48+5:302016-06-25T11:28:48+5:30
बरुण सोबतीची इस प्यार को क्या नाम दूँ ही मालिका खूपच गाजली होती. या मालिकेनंतर बरुण सत्य की किरण ...
.jpg)
बरुणच्या कमबॅकचे काय झाले?
ब ुण सोबतीची इस प्यार को क्या नाम दूँ ही मालिका खूपच गाजली होती. या मालिकेनंतर बरुण सत्य की किरण या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याची चर्चा होती. ही मालिका केवळ २६ भागांची बनवण्याचे प्रो़क्शन हाऊसने ठरवले होते. पण ही मालिका इतक्या कमी भागांची न बनवता ती १२० भागांची बनवली जावी असे वाहिनीचे म्हणणे होते. प्रोडक्शन हाऊसने मालिकेचे बजेट हे २६ भागांसाठीच आखल्यामुळे त्यांच्यासाठी हे शक्यच नव्हते. त्यामुळे या गोष्टीवरून वाहिनी आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये चर्चा सुरू होती. या सगळ्यामुळे मालिका पुढे ढकलण्यात आली होती. मालिका काही दिवसांत तरी सुरू होईल असे कलाकारांना वाटत होते. पण बजेट नसल्याने आता ही मालिका बनवण्याचा विचारच प्रोडक्शन हाऊसने सोडून दिला असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण दिल्ली येथे करण्यातदेखील आलेले होते.