​प्रत्युषाच्या आत्महत्येच्यादिवशी काय झाले होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 12:30 IST2016-04-02T05:28:01+5:302016-04-22T12:30:55+5:30

प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज सिंह याने नवे खुलासे केले आहेत. प्रत्युषा माझ्या मुलाची आई बनणार होती ...

What happened on the day of the suicide? | ​प्रत्युषाच्या आत्महत्येच्यादिवशी काय झाले होते?

​प्रत्युषाच्या आत्महत्येच्यादिवशी काय झाले होते?

रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज सिंह याने नवे खुलासे केले आहेत. प्रत्युषा माझ्या मुलाची आई बनणार होती आणि अबॉर्शनचा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला होता, अशी कबुली त्याने दिली आहेत. शिवाय प्रत्युषाने आत्महत्या केली त्यादिवशी काय काय घडले, हेही त्याने सांगितले आहे. त्याने सांगितले की, ३१ मार्चला प्रत्युषा व मी आम्ही दोघांनीही एका कॉमन फ्रेन्डसोबत पार्टी केली. दुसºया दिवशी सकाळी ९.३० वाजता आम्हाला काहीतरी खायला हवे होते. मी उठलो. तोपर्यंत प्रत्युषा आंघोळीला गेली होती. यानंतर तिने ड्रिंक घेणे सुरु केले. तिला मद्याचे व्यसन होते. मी तिला ड्रिंक न घेण्याची विनंती केली आणि लगेच जेवण आणण्यासाठी बाहेर पडलो. मी घरी परतलो तेव्हा सर्वात आधी बेल वाजवली तेव्हा ती आॅफ होती. डबल लॉक असल्याने माझी चाबी काम करत नव्हती. मी दरवाजा ठोठावला. पण प्रत्युषाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मग मी तिला फोन केलेत, मॅसेजही केले. मी पुन्हा खाली गेलो आणि किल्लीवाल्याला घेऊन आलो. दुसरी चाबी बनवण्याचा विचार सुरु असतानाच आमचा नोकर अला. मी त्याला बाल्कनीतून उडी मारून दरवाजा आतून उघडण्यास सांगितले. त्याने उघडला. मी घरात शिरलो तेव्हा प्रत्युषा पंख्याला लटकलेली होती. मी लगेच तिच्याकडे धावलो आणि तिचे पाय माझ्या खांद्यावर घेतले. किल्लीवाल्याने तिचा दुप्पटा कापला. मी तिच्या चेहºयावर पाणी मारले. चेस्ट पम्प आणि माऊथ टू माऊथ प्रोसेस केली. यानंतर मी लगेच तिला उचलले आणि रूग्णालयाकडे निघालो. कारमध्ये मी तिच्या बाजूला बसलो होतो. मी घाबरलो होतो. सिग्नल तोडत मी हॉस्पीटलमध्ये पोहोचलो.
दरम्यान मुंबई हायकोर्टाने प्रत्युषा प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्याची मागणी खारिज केली आहे. प्रत्युषाच्या पालकांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली.
.....................................................

प्रत्युषाचे कुटुंबीय हायकोर्टात
प्रत्युषा बॅनर्जी हिचे कुटुंबीय न्यायाची मागणी करीत उच्च न्यायालयात पोहोचले आहे. प्रत्युषाची हत्या झाली, असे आम्ही पोलिसांना सांगितले. मात्र याऊपरही पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केली, असा दावा प्रत्युषाच्या कुटुंबीयांनी केला असून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्याची मागणी केली आहे. दरम्यान मृत्यूपूर्वी प्रत्युषा गर्भवती होती आणि मृत्यूच्या आधी तिने गर्भपात केला होता, अशी माहिती जेजे रूग्णालयाच्या रिपोर्टमधून पुढे आली आहे. विशेष म्हणजे पोलिस चौकशीत प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज सिंह याने ही बाब कबूल केली आहे. प्रत्युषाचे अबॉर्शन झाले होते, अशी कबुली त्याने दिली. ती पे्रेगनेंट होती आणि मार्चच्या पहिल्या वा दुसºया आठवड्यात तिने अबॉर्शन केले. यासाठी तिने गाइनोकोलॉजिस्टचा सल्ला घेतला होता. मी बिझी असल्याने डॉक्टरांकडे ती एकटी गेली होती, असे त्याने पोलिसांना सांगितले. या माहितीनंतर राहुलची डिएनए टेस्ट होऊ शकते. प्रत्युषाच्या होणाºया बाळाचा पिता तोच आहे वा अन्य कुणी हे या टेस्टने कळू शकेल.

...................................
नवा खुलासा!!  प्रत्युषाने केले होते अबॉर्शन!!

‘बालिका वधू’फेम प्रत्युषा बॅनर्जी प्रेग्नेंट होती, अशी नवी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जे जे हॉस्पीटलच्या रिपोर्टमधून ही बाब उघड झाली आहे. प्रत्युषाने १ एप्रिलला आत्महत्या करण्यापूर्वी अबॉर्शन केले होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. प्रत्युषा दोन महिन्यांची गर्भवती होती आणि तिने कथितरित्या ओरल पिल घेऊन अबॉर्शन केले होते. यासंदर्भात पोलिस प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज सिंग याला विचारपूस करू शकतात. जेजे हॉस्पीटलमध्ये प्रत्युषाच्या युटरसच्या टिश्यूजची हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणी करण्यात आली होती. यानंतर प्रत्युषा गर्भवती होती व तिने अबॉर्शन केले होते, याची माहिती मिळाली. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या युटरसमध्ये सेकंडरी इन्फेक्शन व इन्जुरी आढळली आहे. जी मिसकॅरेज वा अबॉर्शननी होते.फॉरेन्सिक सर्जनलाही प्रत्युषाच्या युटरसमध्ये पांढºया रंगाचे फ्लूड आढळले होते. ते प्रेग्नसीच्या प्राथमिक अवस्थेचे संकेत देणारे होते. हे फ्लूड हिस्टोपॅथॉलॉजिकल टेस्टसाठी पाठवण्यात आले होते. जेजेचा रिपोर्ट याच टेस्टच्या निष्कर्षावर आधारित आहे. या न जन्मलेल्या मुलाचा बाप कोण, याचा छडा लावणे कठीण असेल, असे डॉक्टरांचे मत आहे. कारण कुठलाही टिश्यू उपलब्ध नसल्याने अशास्थितीत डीएनए टेस्ट करणे आव्हानात्मक आहे. प्रत्युषा राहुल राजसोबत रिलेशनशिपमध्ये होती व दोघेही एकाच फ्लॅटमध्ये राहात होते.
......................................................................................

प्रत्युषा बॉयफ्रेन्डने  दिली आत्महत्येची धमकी?
प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येला चार आठवडे झालेत, तरिही पोलिस अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. गेल्या चार पाच दिवसांपासून पोलिस प्रत्युषाचा बॉयफे्रन्ड राहुल राज सिंह याची चौकशी करताहेत. राहुलवर सध्या उपचार सुरु असून डॉकटर त्याला डिप्रेशनमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न करीत आहेत. शनिवारी पोलिसांनी सुमारे तासभर राहुलची चौकशी केली. पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर मीडियाशी बोलताना राहुलने तो निर्दोष असल्याचा दावा केला. मी निर्दोष आहे. मी काहीही चुकीचे केलेले नाही किंवा प्रत्युषाला कुठल्याहीप्रकारे धोका दिलेला नाही. मुखपृष्ठावरून पुस्तक कसे हे ठरवू नका. मीडियाद्वारे मी हे सांगू इच्छितो, असे तो म्हणाला. मी अजूनही सावरलेलो नाही. मी या धक्क्यातून बाहेर पडू इच्छितो. योग्यवेळी येईल, तेव्हा मी मीडियासोबत खरे काय ते सांगेल, असेही तो म्हणाला. याचदरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राहुलने हॉस्पीटलच्या बाथरूममध्ये स्वत:ला कोंडून घेतले आणि हॉस्पीटलच्या इमारतीवरून उडी घेऊन जीव देण्याची धमकी दिली. शुक्रवारीही पोलिसांनी त्याची पोलिस ठाण्यात दोन तास चौकशी केली यानंतर तो पुन्हा रूग्णालयात पोहोचला. यानंतर काही वेळातच हॉस्पीटलच्या पहिल्या माळ्यावरील बाथरूममध्ये त्याने स्वत:ला कोंडून घेतले होते. तो बराचवेळ बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी काळजीपोटी डॉक्टरांना बोलवले. यानंतर डॉक्टरांनी कशीबशी त्याची समजूत घातल्याचे कळते.
.........................................................
प्रत्युषाचे आई-वडिलांचे न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आई-वडिलांना न्याय हवा आहे. न्यायासाठी प्रत्युषाच्या पालकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून या प्रकरणाची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान प्रत्युषाच्या पालकांच्या या पत्रानंतर, गरज भासल्यास हे प्रकरण गुन्हे शाखेला सोपवले जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत. या प्रकरणाच्या तळाशी जाणे, पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु नसल्याचे आढळल्यास पोलिसांना याचे परिणाम भोगावे लागू शकतात. गरज भासल्यास हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवले जाऊ शकते, असे राज्याचे गृहराज्यमंत्री रंजीत पाटील आज शुक्रवारी यांनी सांगितले.
गत २४ वर्षीय अभिनेत्री  गत १ एप्रिलला गोरेगावस्थित आपल्या निवासस्थानी पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. याप्रकरणी प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज सिंह याच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..............................................................
प्रत्युषाप्रकरणी राखी सावंत व डॉली बिंद्राविरूद्ध कारवाई?
गत १ एप्रिलला टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर बरीच बयानबाजी झाली. टीव्ही ते बॉलिवूड जगतातील अनेकांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले. यातच काहींनी फुकट लोकप्रीयता लाटण्याचेही प्रयत्न केले. डॉली बिंद्रा व राखी या दोघी सर्वांत पुढे होत्या. एका बातमीनुसार, या दोन्ही अभिनेत्रींच्या या खटाटोपाची सिने व टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने गंभीर दखल घेतली आहे. या दोघींविरूद्ध कारवाई करण्याच्या निर्णयाप्रत असोसिएशन पोहोचली आहे. या दोघींनी प्रत्युषा प्रकरणी असंवेदनशील बयानबाजी केली. डॉलीवर प्रत्युषाची रूग्णालयातील छायाचित्रे लीक करण्याचा आरोप आहे तर राखीवर वादग्रस्त बयान देण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अशा नाजूक घटनेनंतर राखीने पंतप्रधानांकडे सीलींग फॅनवर बंदी लादण्याची मागणी केली.  


......................................................................
राहुल राज सिंह याला अटकपूर्व जामीन

राहुल राज सिंह याला अटकपूर्व जामीनप्रत्युषा बॅनर्जी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला तिचा बॉयफ्रेन्ड राहुल राज सिंह याला उच्च न्यायालयाने आज दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला. सध्या राहुल रूग्णालयात आहे. अटक टाळण्यासाठी त्याने सर्वप्रथम दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र दिंडोशी न्यायालयाने राहुलला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. सोमवारी या निर्णयाला राहुलने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज राहुलच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने राहुलला १८ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहे. अर्थात तोपर्यंत त्याला रोज सकाळी पोलिस ठाण्यात जाऊन हजेरी लावावी लागणार आहे. प्रत्युषाच्या पालकांनी पोलिसांना सर्वप्रथम दिलेल्या जबाबात आपल्याविरोधात काहीही आरोप केलेले नाहीत, असा दावा राहुलने अटकपूर्व जामीन अर्जात केला होता. प्रत्युषाने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी वा पत्र लिहून ठेवलेले नाही. शिवाय गळफासामुळे झालेल्या व्रणाऐवजी तिच्या शरिरावर कुठल्याही जखमा नाहीत, असा दावाही राहुलने केला होता.
..................................................................
प्रत्युषा घ्यायची मोलकणीकडून उधार
टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी तिच्या घरी काम करणारी बाई रेणु सिन्हा हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
प्रत्युषाकडे बराच बँक बॅलन्स होतर. मात्र तरिही अनेक लहान मोठ्या गरजांसाठी ती आपल्या मोलकणीकडून पैसे उधार घ्यायची. औषधे, कॅब हायर करणे यासारख्या कामांसाठी ती मोलकणीकडून उधार घ्यायची. रेणुने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्युषाने आपले क्रेडिट कार्ड, एटीएम सगळे राहुलकडे दिले होते. रेणुने सांगितले की, प्रत्युषा आणि मी बरेच जवळ आलो होतो. ती मला दीदी म्हणायची. राहुलला प्रत्युषाची आई घरात नको होती. म्हणून प्रत्युषाची आई परत गेली. पण जाताना तिने मला प्रत्युषाची काळजी घेण्यास सांगितले होते.  रात्री बरेचदा प्रत्युषाच्या घरातून भांडणाचे आवाज यायचे. मला प्रत्युषाची मदत करावी असे वाटायचे. पण शेवटी त्यांचा खासगी वाद म्हणून मी टाळायचे. राहुल नसताना मात्र ती मला अनेकदा सांगायची. राहुल प्रत्युषाच्या एक्स बॉयफे्रन्डवरून भांडणे उखरून काढायचा. मी अनेकदा प्रत्युषाला राहुलपासून संबंध तोडण्याचा सल्ला तिला दिला. मात्र प्रत्युषा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होती.   वारंवार ब्रेकअपमुळे कुटुंबाची बदनामी होईल, असा विचार ती करायची. राहुलकडून पासबुक, के्रडिट कार्ड सगळे घेऊन घे,असा सल्लाही मी तिला दिला होता. मात्र काही कारणाने मी असे करू शकत नाही, असे प्रत्युषा मला म्हणाली होती. प्रत्युषा राहुलसाठी जेवण बनवायची. ती राहुलवर प्रचंड प्रेम करायची. मात्र हळूहळू तिला राहुलच्या भूतकाळाविषयी माहिती मिळाली. राहुल प्रत्युषाला तिच्या मनासारखे काहीच करू द्यायचा नाही. लग्नाचा विषयही तो सारखा टाळायचा.
................................................................

वाचा : प्रत्युषा प्रकरणी  आणखी धक्कादायक खुलासे
एकीकडे मुंबई पोलिस प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येमागच्या कारणांचा छडा लावण्यात गुंतले असताना दुसरीकडे या प्रकरणी एका पाठोपाठ एक अशा धक्कादायक खुलाशांचा ‘सिलसिला’ अद्यापही सुरु आहे. प्रत्युषाचा बॉयफ्रेन्ड राहुल राज सिंग याचे माजी वकील नीरज गुप्ता यांनी  या प्रकरणासंदर्भात अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.
 एक पत्रपरिषद घेऊन गुप्ता यांनी राहुलवर अनेक गंभीर आरोप लावले. नीरज गुप्ता हे आधी राहुलचे वकील होते. मात्र  राहुलने अनेक बाबतील अंधारात ठेवल्यामुळे नीरज गुप्ता हे स्वत:हून या प्रकरणापासून वेगळे झाले. त्यांनी या खटल्यातून आपले अंग काढून घेतले. नीरज गुप्ता यांनी पत्रकारांना सांगितले की, प्रत्युषाच्या मृत्यूच्या एक रात्री आधी ३१ मार्चला राहुल एका मुलीसोबत रेस्टॉरंटमध्ये पार्टी करीत होता. या मुलीसोबत त्यांचा वादही झाला होता. राहुल आधी मुलींना ड्रग्जचे व्यसन लावायचा आणि नंतर त्यांना धोका देत त्यांच्यापासून दूर व्हायचा. प्रत्युषासोबतही त्याने असेच केले. १ एप्रिलला प्रत्युषा दिवसभर दारू पीत होती. याच संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. सकाळपास

Web Title: What happened on the day of the suicide?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.