अस्सं सासर सुरेख बाई मध्ये यशचा अपघात की घात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2017 17:54 IST2017-06-05T12:24:07+5:302017-06-05T17:54:07+5:30
अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेला आता चांगलेच वळण मिळणार आहे. या मालिकेत सध्या जुई गरोदर असल्याचे आपल्याला पाहायला ...
.jpg)
अस्सं सासर सुरेख बाई मध्ये यशचा अपघात की घात
>अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेला आता चांगलेच वळण मिळणार आहे. या मालिकेत सध्या जुई गरोदर असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. जुईच्या या गोड बातमीमुळे सध्या सगळेच खूप खूश आहेत. यश आणि जुईच्या घरात येणाऱ्या या नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी सगळेच आतुर झाले आहेत. यश आणि जुई यांचे एकमेकांवर अतोनात प्रेम असल्याचे आपल्याला मालिकेत पाहायला मिळते. प्रत्येक संकटात ते नेहमीच एकमेकांना साथ देतात. या मालिकेत यश ही भूमिका संतोष जुवेकर तर जुई ही भूमिका मृणाल दुसानीस साकारत आहे. या मालिकेतील संतोष आणि मृणाल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. पण
या मालिकेत नुकताच यशला अपघात झाला आहे. यशच्या अपघातामुळे सगळ्यांनाच चांगला धक्का बसला आहे. यशची प्रकृती गंभीर असल्याने तो वाचेल की नाही हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. आपला आवडता यश मृत्यूच्या दाढेतून परतावा असे या मालिकेच्या फॅन्सना देखील वाटत आहे. यशचा अपघात झाल्याने त्याच्या कुटुंबातील सगळे तर चांगलेच टेन्शनमध्ये आले आहेत. यश या अपघातातून वाचतो की नाही हे आपल्याला काहीच दिवसांत कळणार आहे.
या मालिकेत यशचा अपघात झाला असल्याचे सगळ्यांना वाटत आहे. पण यशचा अपघात झाला नसून त्याला कोणीतरी मारायचा प्रयत्न केला असल्याचे प्रेक्षकांना मालिकेत आता पाहायला मिळणार असल्याचे कळतेय. या सगळ्यामुळे मालिका अधिकच रंजक बनणार आहे. यशला कोणी आणि का मारायचा प्रयत्न केला याचे उत्तर काहीच दिवसांत प्रेक्षकांना मिळेल असे म्हटले जात आहे.