सुशांतचा ऑनस्क्रिन मुलगा त्याच्याबद्दल काय म्हणतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 12:21 IST2016-10-21T12:21:05+5:302016-10-21T12:21:05+5:30

पवित्र रिश्ता या मालिेकेत अनुभव श्रीवास्तवने सुशांत सिंग राजपूतच्या मुलाची भूमिका साकारली होती. अनुभव सध्या विद्या... एक किरण उम्मीद ...

What does Sushant's onscreen son say about him? | सुशांतचा ऑनस्क्रिन मुलगा त्याच्याबद्दल काय म्हणतोय?

सुशांतचा ऑनस्क्रिन मुलगा त्याच्याबद्दल काय म्हणतोय?

ित्र रिश्ता या मालिेकेत अनुभव श्रीवास्तवने सुशांत सिंग राजपूतच्या मुलाची भूमिका साकारली होती. अनुभव सध्या विद्या... एक किरण उम्मीद की या मालिकेत झळकत आहे. अनुभवला सुशांतसोबत जास्त दिवस काम करता आले नाही याचे त्याला खूप वाईट वाटते. पवित्र रिश्ता या मालिकेत सुशांतला तीन मुलांच्या वडिलांची भूमिका साकारायची होती. कारकिर्दीच्या सुरुवातीला वडिलांच्या भूमिकेत झळकणे सुशांतला पटले नसल्याने त्याने ही मालिका सोडली होती. त्यामुळे अनुभवला केवळ तीन महिनेच सुशांतसोबत काम करता आले. पण भविष्यात सुशांतसोबत काम करण्याची त्याची इच्छा अाहे. तो सांगतो, "मी पवित्र रिश्ता या मालिकेचा भाग बनल्यानंतर केवळ तीन महिन्यातच सुशांतने पवित्र रिश्ता ही मालिका सोडली आणि हितेन तेजवानीने त्याची जागा घेतली. तीन मुलांच्या बापाची व्यक्तिरेखा साकारणे त्याला पटत नसल्याने त्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मला त्याच्यासोबत जास्त दिवस काम करता आले नाही. भविष्यात त्याच्यासोबत काम करायला मला नक्कीच आवडेल. "
सुशांत सिंग रजपूतने किस देश में है मेरा दिल या या मालिकेद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पवित्र रिश्ता या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेतील त्याची आणि अंकिता लोखंडेची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेत सुशांतने साकारलेली मानव ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेनंतर सुशांतला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. त्याने काय पो छे या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये एंट्री केली आणि आता तर एम.एस. धोनी ः द अन्टोल्ड स्टोरी या त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे.




Web Title: What does Sushant's onscreen son say about him?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.