काय सांगता,भजनसम्राट अनुप जलोटा यांनी वयाच्या ६० वर्षी गर्लफ्रेंडसह घेतले सप्तपदी?, लग्नाच्या गेटअपमधला फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 12:25 PM2020-10-09T12:25:40+5:302020-10-09T12:31:01+5:30

सोशल मीडियावर भजनसम्राट अनुप जलोटा आणि गर्लफ्रेंड जसलीन मथारू या दोघांनी लग्न केले असल्याची चर्चा सुरू असून त्यांचे लग्नाचे फोटोही तुफान व्हायरल होत आहे.

What ! Anup Jalota And Jasleen Matharu wedding Looks Photos Viral On Internet | काय सांगता,भजनसम्राट अनुप जलोटा यांनी वयाच्या ६० वर्षी गर्लफ्रेंडसह घेतले सप्तपदी?, लग्नाच्या गेटअपमधला फोटो होतोय व्हायरल

काय सांगता,भजनसम्राट अनुप जलोटा यांनी वयाच्या ६० वर्षी गर्लफ्रेंडसह घेतले सप्तपदी?, लग्नाच्या गेटअपमधला फोटो होतोय व्हायरल

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो 'बिग बॉस १२' मध्ये भजनसम्राट अनुप जलोटा यांचे जसलीन मथारूसह असलेले अफेअर पहिल्यांदाच जगजाहीर झाले होते. बिग बॉसमध्ये दोघेही खूप चर्चेत होते. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी बिग बॉसच्या निर्मात्यांनीच अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या प्रेमकरणाचा घाट घाताल होता. अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या या कथित रिलेशनशिपवर कुणाचाही विश्वास बसला नव्हता. भजनसम्राट अनुप जलोटा असे काही करतील यावरच कोणाचा विश्वास नव्हता. या अजब गजब जोडीची मात्र सर्वत्रच चर्चा झाली होती.'बिग बॉस'मध्ये सतत चर्चेत राहण्यासाठी त्यांनी जसलीन मथारूसह अफेअर असल्याची कबुली दिली होती. भजनसम्राट यांच्या अफेअरच्या बातम्यांनी त्यांच्या चाहत्यांची चांगलीच झोप उडवली होती.

मात्र आता अजब गजब कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता तर त्यांनी थेट ४४० व्होल्टचाच झटका त्यांच्या चाहत्यांना दिला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण आता पर्यंत केवळ त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत होते. मात्र ते ही एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव केली होती. आथा तर थेट या दोघांच्या लग्नाचेच फोटो समोर आले आहेत. वयाच्या ६० वर्षी अनुप जलोटा यांनी बाशिंग बांधले आहेत तर त्यांच्या तथाकथिक गर्लफ्रेंड जसलीन मथारूही नववधूच्या गेटअपमध्ये पाहायला मिळतेय.  

सोशल मीडियावर भजनसम्राट अनुप जलोटा आणि गर्लफ्रेंड जसलीन मथारू या दोघांनी लग्न केले असल्याची चर्चा सुरू असून त्यांचे लग्नाचे फोटोही तुफान व्हायरल होत आहे.खुद्द जसलीन मथारूनेच हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर होताच अनेकांना मोठा धक्काच बसला आहे. बहुतेकांना तर हा फोटो पाहून विश्वासच बसत नाही. तसेच नेहमीप्रमाणे अनुप जलोटा आणि जसलीनचा हा फोटोदेखील एक पब्लिसिटी स्टंटच आहे. लवकरच दोघेही एका सिनेमात एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचाच हा फोटो असावा. फोटोवरून सिनेमा देखील या दोघांवर आधारित असून अजब-गजब लव्हस्टोरीवर असल्याची तर्कवितर्कही लावले जात आहे. 

Also Read: जसलीनसोबत प्रेमाचे नाटक करणार्‍या अनूप जलोटा यांना दर आठवड्याला मिळायचे लाखो रूपयांचे मानधन

Also Read: देवा, ऐकावे ते नवलच, आता भजनसम्राट अनुप जलोटाच करणार गर्लफ्रेंड जसलीन मथारुचे कन्यादान

Also Read: बिग बॉसच्या स्पर्धकावर आलीय मॉलमध्ये झाडू मारण्याची वेळ, हा घ्या पुरावा

Web Title: What ! Anup Jalota And Jasleen Matharu wedding Looks Photos Viral On Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.