बँकॉकमध्ये ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’च्या कलाकारांचे जल्लोषात झाले स्वागत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 11:17 IST2018-01-20T05:47:05+5:302018-01-20T11:17:05+5:30

छोट्या पडद्यावरील ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’ ही लोकप्रिय मालिका सध्या आपल्या पहिल्याच परदेश दौ-यावर थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये आली आहे. ...

Welcome to 'Sun Suri, I Shanti Piyaaji' in Bangkok! | बँकॉकमध्ये ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’च्या कलाकारांचे जल्लोषात झाले स्वागत!

बँकॉकमध्ये ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’च्या कलाकारांचे जल्लोषात झाले स्वागत!

ट्या पडद्यावरील ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’ ही लोकप्रिय मालिका सध्या आपल्या पहिल्याच परदेश दौ-यावर थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये आली आहे. या मालिकेचा पूर्वीचा अवतार ‘दिया और बाती हम’ ही मालिका थायलंडमध्ये तिशय लोकप्रिय झाली होती आणि तिला प्रचंड प्रेक्षकवर्ग लाभला होता. त्यामुळे या मालिकेच्या पुढच्या भागातील कलाकार बँकॉकमध्ये चित्रीकरणासाठी येत आहेत, ही बातमी समजल्यावर या चाहत्यांनी त्यांचे प्रेमळ स्वागत करण्याचा निर्णय घेतला.या मालिकेच्या कथानकाने यापूर्वीच नवी कलाटणी घेतल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली असून आता बँकॉकमधील कथाभागाचे चित्रीकरण त्यातील नाट्यमयता उत्कर्षाला नेणार आहे, असे सांगितले जाते.या मालिकेचे थायलंडमधील चाहते या कलाकारांच्या स्वागतासाठी उत्सुक होते आणि ते जेव्हा विमानतळावर आले,तेव्हा त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विमानतळावर फुलांचे हार आणि फलकावर आपली छायाचित्र घेऊन आपल्या स्वागतासाठी आलेले शेकडो चाहते पाहून या मालिकेतील कलाकार आश्चर्यचकित झाले.या चाहत्यांचे हे प्रेम आणि उत्साह पाहून खुशीत आलेल्या या कलाकारांनी या चाहत्यांना आपल्या स्वाक्ष-या देऊ केल्या आणि त्यांच्याबरोबर छायाचित्रे काढली.मालिकेत कनकची भूमिका रंगविणारी रिहा शर्मा म्हणाली, “विमानतळावरच आमचं स्वागत करण्यासाठी आमचे अनेक चाहते आल्याचं पाहून आम्हाला आश्चर्यच वाटलं.आमच्या स्वागतासाठी त्यांनी फारच मेहनत घेतली होती आणि त्यामुळे आम्ही सर्वजण एकदम भारावून गेलो. बँकॉकमधील आमच्या चित्रीकरणाबद्दल मी आता फारच उत्सुक झाले आहे.”
Also Read:अविनाश रेखीने बनवले ‘सिक्स पॅक अॅब्स!

‘तू सूरज, मैं सांझ पियाजी’ या मालिकेतून अविनाश रेखीने छोट्य़ा पडद्यावर कमबॅक केले आहे.मालिकेत तो रिहा शर्माचा नायक उमा शंकरची भूमिका साकारत आहे.अविनाशने यापूर्वी 'मधुबाला' आणि 'छल' यासारख्या मालिकांमधून भूमिका साकारल्या होत्या.निर्मात्यांना या भूमिकेसाठी देखणा आणि सुदृढ व्यक्तिमत्त्वाच्या कलाकाराची गरज होती आणि अविनाश त्या कसोटीला पुरेपूर उतरला.अविनाश यात उमाशंकर या कट्टर परंपरानिष्ठ व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.“माझी या मालिकेसाठी निवड झाल्यापासून मी नियमित व्यायाम आणि आहार सुरू केला असल्याचे त्याने अविनाशने सांगितले होते. 

Web Title: Welcome to 'Sun Suri, I Shanti Piyaaji' in Bangkok!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.