हम तो बच्चे बन गये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:23 IST2016-10-10T05:13:52+5:302016-10-17T10:23:42+5:30
इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत बरुण सोबती आणि सान्या इराणी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या ...
हम तो बच्चे बन गये
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत बरुण सोबती आणि सान्या इराणी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान या दोघांची घट्ट मैत्री झाली होती. ही मालिका संपून आज अनेक महिने झाले असले तरी ते दोघे वेळात वेळ काढून नेहमीच एकमेकांसोबत फिरायला जातात. नुकतेच त्यांनी एका गेम झोनमध्ये जाऊन खूप सारे गेम्स खेळले आणि खूप मजामस्ती केली. या मजा मस्तीचे फोटो सान्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. सान्या आणि वरुणसोबत अभिनेता मोहित सेहगलदेखील होता. मोहित आणि सान्या पती-पत्नी आहेत. सान्या आणि मोहितच्या लग्नानंतर मोहित आणि बरुणचीदेखील चांगली फ्रेंडशिप झाली आहे. त्या तिघांनीही आपले वय विसरून एखाद्या लहान मुलाप्रमाणे खेळाचा आनंद लुटला.