​पहरेदार पिया की फेम तेजस्वी प्रकाश वायंगणकर सांगतेय, रिश्ता लिखेंगे हम नया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 13:24 IST2017-10-09T07:54:21+5:302017-10-09T13:24:21+5:30

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांना पहरेदार पिया की ही मालिका पाहायला मिळाली होती. या मालिकेत एक आठ वर्षांचा ...

The watchman Piya ki fame stunning Prakash Waingankar kantheyay, the relationship will write we will new | ​पहरेदार पिया की फेम तेजस्वी प्रकाश वायंगणकर सांगतेय, रिश्ता लिखेंगे हम नया

​पहरेदार पिया की फेम तेजस्वी प्रकाश वायंगणकर सांगतेय, रिश्ता लिखेंगे हम नया

नी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांना पहरेदार पिया की ही मालिका पाहायला मिळाली होती. या मालिकेत एक आठ वर्षांचा मुलगा आणि एक १८ वर्षांची तरुणी यांचे लग्न दाखवण्यात आले होते. प्रेक्षकांना ही कथा न रुचल्यामुळे या मालिकेविरोधात इंडियन ब्रॉडकास्टिंग कन्टेन्ट कम्प्लेन्ट्स काउन्सिलकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. या गोष्टीची गंभीर दखल  घेत ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही मालिका शशी सुमित प्रॉडक्शन हाऊसची होती. आता हेच प्रोडक्शन हाऊस प्रेक्षकांसाठी रिश्ता लिखेंगे हम नया ही नवीन मालिका घेऊन आले असून या मालिकेत प्रेक्षकांना पहरेदार पिया की याच मालिकेतील अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत तेजस्वी प्रकाश वायंगणकर ही दियाची भूमिका तर रोहित सुचान्ति रतनची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
रिश्ता लिखेंगे हम नया या मालिकेची कथा खूपच वेगळी असून एक आगळी वेगळी कथा प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा सेट हा भव्य असणार असून या सेटवर निर्मात्यांनी खूप सारा खर्च केला आहे. रिश्ता लिखेंगे हम नया ही मर्यादित भागांची मालिका असणार आहे. स्त्रीचे एक वेगळे रूप या मालिकेद्वारे प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आहे.
रिश्ता लिखेंगे हम नया मध्ये जतीन लालवानी, गिरीश सचदेव, सिद्धार्थ शिवपुरी, आदिती देशपांडे, हरमीत कौर, मीनु रांचल, आशेर भरद्वाज, कस्तुरी मैत्र, मनिषा सक्सेना आणि वरुण जैन या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या मालिकेविषयी या मालिकेचे निर्माते सुमित मित्तल सांगतात, "पहरेदार पिया की ही मालिका बंद झाल्यानंतर या मालिकेच्या टीमसोबत आम्ही पुन्हा मालिका करणार आहोत असे आम्ही तेव्हाच सांगितले होते. त्यानुसार आम्ही रिश्ता लिखेंगे हम नया ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना खूप चांगले कलाकार पाहायला मिळणार असून या मालिकेची संकल्पना प्रेक्षकांना खूप आवडेल अशी मला खात्री आहे. 

Also Read : ​तेजस्वी वायंगणकर तैवानमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन,'पहरेदार पिया की' मालिकेमुळे आली होती चर्चेत

Web Title: The watchman Piya ki fame stunning Prakash Waingankar kantheyay, the relationship will write we will new

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.