Watch Video : ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्यावर डिट्टोचा डान्स बघाल तर थक्क व्हाल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 19:30 IST2017-08-10T14:00:41+5:302017-08-10T19:30:41+5:30
तुम्हाला डिट्टो आठवतेय ना? होय तिच अमेरिकन मुलगी, जिच्या डान्सने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
(1).jpg)
Watch Video : ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्यावर डिट्टोचा डान्स बघाल तर थक्क व्हाल !
त म्हाला डिट्टो आठवतेय ना? होय तिच अमेरिकन मुलगी, जिच्या डान्सने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. आपल्या युनिक डान्स स्टाइलमध्ये डिट्टो सध्या इंटरनेट सन्सेशन बनली आहे. आज तिच्या डान्सचा डंका जगभरात गाजत असून, भारतात चालता-बोलता रोबोट आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
‘बार्बी गर्ल’ या गाण्यावर ब्रेक डान्स करून सन्सेशन बनलेली डिट्टो नुकतीच भारतात आली आहे. ती रेमो डिसूझाच्या ‘डान्स प्लस’ या डान्सिग रिअॅलिटी शोमध्ये बघावयासही मिळाली. वास्तविक शोमध्ये डिट्टो पाहुणी म्हणून होती, परंतु जेव्हा तिने या शोमध्ये तिचा डान्स दाखविला तेव्हा सगळेच दंग झाले. प्रेक्षकांच्या मागणीवरून डिट्टोने डान्स केला, अन् देशभरातील प्रेक्षकांना तिने आपलेसे केले. डिट्टोच्या अनोख्या डान्स स्टाइलवर उपस्थित तर फिदा झालेच, शिवाय टीव्हीवर बघणारे प्रेक्षकही तिच्या प्रेमात पडले नसतील तरच नवल.
डिट्टोची युनिक डान्सिंग स्टाइल ‘डान्स प्लस’ शोमध्ये बघावयास मिळाली. पॉपिंग, रोबॉटिंग, ब्रेक डान्स अशा डान्सिंग स्टाइल्समध्ये तिने एक परफेक्ट परफॉर्मन्स केला. डिट्टोने अक्षयकुमार आणि रविना टंडन स्टारर ‘मोहरा’ या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्यावर डान्स केला. असे म्हटले जात आहे की, डिट्टोने पहिल्यांदाच बॉलिवूड गाण्यावर डान्स केला आहे. डिट्टोने ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनवर डान्स केला.
रिपोर्ट्सनुसार डिट्टाने चियरलीडर आणि जिमनास्ट म्हणून करिअरला सुरुवात केली होती. पुढे तिने ब्रेक डान्स, हिप-हॉप, रॉबर्टिंग, फिंगर ट्युटिंग आणि बºयाचशा डान्सिंग स्टाइल्सवर प्रभुत्व मिळविले. दरम्यान, डिट्टाचे रेमोच्या शोमधील हा डान्स तिच्या इतर डान्सप्रमाणेच वाºयासारखा व्हायरल झाला आहे. तिचा डान्सचा हा व्हिडीओ ७ आॅगस्ट रोजी अपलोड करण्यात आला. आतापर्यंत हा व्हिडीओ २४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे.
१९ वर्षीय डिट्टोचा हा डान्स म्हणजे चालता-बोलता रोबोट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. जेव्हा डिट्टो तिचा जलवा दाखवित होती तेव्हा डान्सर राघव जुआल, धर्मेंश आणि उपस्थित सर्व स्पर्धक तिच्या या अनोख्या स्टाइलवर फिदा झाले होते. डिट्टो अटलांटा येथील रहिवासी असून, तिने चिअरलीडर म्हणूनही काम केले आहे. सोशल मीडियावर तिचे १.२ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स असून, सबक्राइबर्सची संख्याही लाखात आहे. जगभरातील डान्सर तिला आदर्श मानतात.