Watch Video : सुनील ग्रोवरला मिस करतोय कॉमेडीयन कपिल शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 18:01 IST2017-07-12T12:03:51+5:302017-07-12T18:01:23+5:30

सुनील ग्रोवर पुन्हा परतावा अशी माझीही मनापासूनची इच्छा असल्याचे कपिलने या फेसबुक चॅटच्या माध्यमातून सांगितले आहे.

Watch Video: Comedian Kapil Sharma is missing Miss Sunil Grover | Watch Video : सुनील ग्रोवरला मिस करतोय कॉमेडीयन कपिल शर्मा

Watch Video : सुनील ग्रोवरला मिस करतोय कॉमेडीयन कपिल शर्मा

िल शर्माची तब्येत बिघडल्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची अचानक बिघडलेल्या तब्येतीमुळे वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा होत होत्या. मात्र कपिल सध्या एकाच गोष्टीमुळे चिंतेत आहे ती म्हणजे कॉमेडीयन सुनील ग्रोवर. रोज मीडियात कपिल शर्मा विषयी वेगवेगळ्या गोष्टी छापून येतात.त्यातल्या काही अफवा असतात तर काही ख-या बातम्या असतात.त्यामुळे स्वत:एकदा रसिकांशी संवाद साधत रसिकांचे कन्फुजन दुर करण्याच्या प्रयत्नात कपिल शर्मा आहे. सध्या कपिल शर्मा चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी फेसबुक लाईव्ह चॅट करत असतो. त्यात त्याचे चाहते त्याला वेगवेगळे प्रश्न विचारत असतात.मात्र त्यात सुनील ग्रोवर कधी परतणार हा प्रश्न आवर्जुन विचारला जातो. यांवर उत्तर देताना कपिल शर्मा म्हणाला की, मित्र आहे तो आपला,त्याला जेव्हा परतावंसं वाटेल तेव्हा तो येऊ शकतो. सुनील पुन्हा परतावा अशी माझीही मनापासूनची इच्छा असल्याचे कपिलने या फेसबुक चॅटवर सांगितले. तुमच्याप्रमाणेच मी देखील सुनीलला खुप मीस करत असल्याचे कपिलने म्हटले आहे. सुनील ग्रोवरच्या जाण्याने कपिल शर्मा शोची टीआपरीवरही मोठा परिणाम झाला आहे. कपिलचे ऑस्ट्रेलिया दौ-या दरम्याने सुनील ग्रोवरसह झालेले भांडणामुळे सुनीलने कपिलच्या शोला राम राम ठोकला होता. मात्र सुनील या शोचा भाग नाही हे कळताच रसिकांनीही या शोला पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हा शो फक्त कपिल शर्माच्या नावामुळे लोकप्रिय असल्याच्या भ्रमात असलेला खरा हिरो कोण आहे याचेही उत्तर कपिल शर्माला मिळाले आहे. सध्या चंदन प्रभाकर ,किकु शारदा आणि सुमोना चक्रवर्ती हेच कॉमेडीयन कपिल शर्माला साथ देत आहे. त्यातही कपिल शर्मासह ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या वादामुळे सुनील ग्रोवरसह चंदन प्रभाकरनेही कपिलची साथ सोडली होती. मात्र सगळे गिले शिकवे विसरत चंदन प्रभाकर पुन्हा एकदा कपिलच्या टीममध्ये परतला आहे.कपिल शर्माला टक्कर देण्यासाठी 'ड्रामा कंपनी' नावाने नवी कॉमेडी शो लवकरच सुरू होणार आहे. या शोमध्ये सुदेश लहरी,कृष्णा अभिषेक, सुगंधा मिश्रा, डॉ संकेत भोसले आणि अली असगर हे कॉमेडीयन रसिकांना हसून हसून लोटपोट करताना दिसतील.

 

Web Title: Watch Video: Comedian Kapil Sharma is missing Miss Sunil Grover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.