​निष्ठा शर्माने मिळवले द व्हॉईस इंडिया किड्सचे विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2016 16:44 IST2016-10-24T16:44:10+5:302016-10-24T16:44:10+5:30

सुलतानपूरच्या निष्ठा शर्माने द व्हॉईस इंडिया किड्सच्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद मिळवले. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे प्रचंड मन जिंकले होते. या ...

The Voice India Kids' title won by loyalty | ​निष्ठा शर्माने मिळवले द व्हॉईस इंडिया किड्सचे विजेतेपद

​निष्ठा शर्माने मिळवले द व्हॉईस इंडिया किड्सचे विजेतेपद

लतानपूरच्या निष्ठा शर्माने द व्हॉईस इंडिया किड्सच्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद मिळवले. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे प्रचंड मन जिंकले होते. या कार्यक्रमातील सगळ्याच लहान मुलांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. त्यामुळे या स्पर्धकांमधून कोण विजेता ठरेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. निष्ठाचा आवाज खूपच चांगला असल्याने या कार्यक्रमाचे परीक्षक शान, नीती आणि शेखर तिला प्रेमाने सरगम क्वीन असेच म्हणत असत. या कार्यक्रमात शान, नीती आणि शेखर यांच्या वेगवेगळ्या टीम होत्या. प्रत्येक परीक्षक आपल्या टीममधील स्पर्धकाला मार्गदर्शन करत होते. निष्ठा नीतीच्या टीममधील होती. निष्ठाचे वैशिष्ट्य म्हणजे ती कधीच डेंजर झोनमध्ये आली नाही. याविषयी निष्ठा सांगते, "मला मार्गदर्शन केल्याबद्दल मी नीती मॅमची आभारी आहे. तसेच मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या पालकांनी मला जो पाठिंबा दिला त्यासाठी मी त्यांची ऋणी आहे. आज मी त्यांच्यामुळेच हे यश मिळवू शकले आहे." या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाला ए दिल मुश्किल या चित्रपटातील रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा आले होते. त्यांनी सगळ्या स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले. 
द व्हॉईस इंडिया किड्स या कार्यक्रमात एकूण 94 स्पर्धक देशातील विविध भागांतून आले होते. त्यातील 18 जणांची अंतिम टप्प्यात निवड करण्यात आली. सर्वात शेवटी सहा स्पर्धकांमध्ये स्पर्धा रंगली होती. त्यातील काव्या लिमये, विश्वप्रसाद आणि निष्ठा शर्मा हे नीतीच्या टीममधील तर पूजा आणि प्रियांशी शर्मा शानच्या टीममधील होते. श्रेया बासू या शेखरच्या टीममधील केवळ एकाच स्पर्धकाने अंतिम टप्प्यात धडक मारली होती.



Web Title: The Voice India Kids' title won by loyalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.