​विवेक म्हणाला, ‘दिव्यांका पटाखा लग रही थी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 19:33 IST2016-07-09T14:03:31+5:302016-07-09T19:33:31+5:30

टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया शुक्रवारी लग्नगाठीत अडकले. पारंपरिक हिंदू रितीरिवाजाने हे लग्न पार पडले. यावेळी ...

Vivek said, 'Diwali looked like a cracker' | ​विवेक म्हणाला, ‘दिव्यांका पटाखा लग रही थी’

​विवेक म्हणाला, ‘दिव्यांका पटाखा लग रही थी’

व्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया शुक्रवारी लग्नगाठीत अडकले. पारंपरिक हिंदू रितीरिवाजाने हे लग्न पार पडले. यावेळी लाल जोड्यातील दिव्यांका अतिशय सुंदर दिसत होती. लग्नानंतर दिव्यांका व विवेक दोघेही पत्रकारांना सामोरे गेले. यावेळी दिव्यांका कशी दिसतेय, असा प्रश्न पत्रकारांनी विवेकला केला. यावर विवेकने काय उत्तर दिले माहितीय, ‘पटाखा लग रही है’, असे विवेक म्हणाला. मी लग्नमंडपात ही प्रतिक्रिया देऊ शकलो नाही. कारण तिथे खूप सारे लोक होते, हे सांगायलाही तो विसरला नाही. हाच प्रश्न दिव्यांकालाही विचारण्यात आला, यावर विवेक नेहमीच हँडसम दिसतो, आजही तसाच हँडसम दिसत होता.   माझी नजर त्याच्या चेहºयावरून हलतच नव्हती, असे दिव्यांका म्हणाली. ‘ये है मोहब्बते’ या मालिकेत दिव्यांका व विवेक काम करत आहेत. वेल, विवेक व दिव्यांका खरोखर लग्नात अतिशय सुंदर दिसत होते. आमच्याकडूनही या नवदांम्पत्याला शुभेच्छा!









Web Title: Vivek said, 'Diwali looked like a cracker'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.