'व्हिवा'चे यश'चॅनल व्ही'ने महिलांच्या म्युझिक बँडसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:45 IST2016-01-16T01:13:32+5:302016-02-07T13:45:41+5:30

'चॅनल व्ही'ने महिलांच्या म्युझिक बँडसाठी आयोजित केलेली स्पर्धा आठवते? यात 'व्हिवा' हा बँड विजेता ठरला होता. त्यानंतर २00२ मध्ये ...

'Viva' success 'Channel V' for women's music band | 'व्हिवा'चे यश'चॅनल व्ही'ने महिलांच्या म्युझिक बँडसाठी

'व्हिवा'चे यश'चॅनल व्ही'ने महिलांच्या म्युझिक बँडसाठी


/>'चॅनल व्ही'ने महिलांच्या म्युझिक बँडसाठी आयोजित केलेली स्पर्धा आठवते? यात 'व्हिवा' हा बँड विजेता ठरला होता. त्यानंतर २00२ मध्ये आलेल्या त्यांच्या अल्बमने चांगली लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या यशामुळे अनेक मुलींना संगीतात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. नंतर हा ग्रुप विलग झाला तरी 'व्हिवा'च्या मेंबर्सची यशस्वी वाटचाल सुरूच आहे. यातील सदस्य विविध ठिकाणी आपले अस्तित्व टिकवून आहेत.
१. अनुष्का मनचंदा : उंच, सडसडीत आणि जॉली पर्सनॅलिटीची धनी असलेल्या अनुष्काला बॉलिवूडमध्ये चांगली संधी मिळाली आणि तिने ती साधलीदेखील! 'गोलमाल', 'एक मै और एक तू', 'डान्स बसंती' यांसारख्या उडत्या गाण्यांमुळे तिचे अनेक चाहते तयार झाले आहेत.
२. नेहा भासीन : अनुष्काप्रमाणे नेहानेही बॉलिवूड तसेच तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये बस्तान बसवले. फॅ शन क्रेझी असलेल्या नेहाला आपल्या केसांवर सतत प्रयोग करायला आवडते. यामुळे तिला 'बॉलिवूड संगीतातील लेडी गागा', असे संबोधतात. 'लठ्ठे दि चद्दर' या तिच्या गाण्याने रसिक वेडे झाले होते.
३. प्राची मोहपात्रा : व्हिवा बँडमधील सर्वांत सुंदर सिंगर म्हणजे प्राची! तिच्या सोबर पण सुंदर अदा लक्षात राहणार्‍या होत्या. २00५ मध्ये प्राचीचा सोलो अल्बम रिलीज झाला.
येत्या ४ डिसेंबरला रिलीज होणार्‍या 'द अँग्री इंडियन गॉडेस' या चित्रपटासाठीही तिने पार्श्‍वगायन केले आहे.
४. महुआ कामत : 'व्हिवा' ग्रुप फुटल्यानंतर महुआ गायनाच्या क्षेत्रात टिकून राहिली. तिने बॉलिवूडमध्ये अनेक सोलो गाणी गायली. याचदरम्यान तिचे एका संगीतकाराशी सूत जुळले. त्याच्यासोबतच महुआने संसार थाटला आहे.
५. सीमा रामचंदानी : बँड फुटल्यानंतर ग्लॅमरच्या या दुनियेला सीमाने रामराम ठोकला. ती 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या आश्रयाला गेली. या फाऊंडेशनच्या अनेक प्रार्थनांना तिने आवाज दिला. आर्ट ऑफ लिव्हिंगचा परिणाम म्हणावा की काय, सीमा पूर्वीपेक्षा जास्त फ्रेश आणि सुंदर दिसत असल्याचे तिचे चाहते सांगतात.

Web Title: 'Viva' success 'Channel V' for women's music band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.