'भाभीजी'च्या विभूतीला मिळेना काम,पत्नीसाठी विभूती नारायण लवकरच बनणार स्पर्म डोनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 13:10 IST2017-12-21T07:40:59+5:302017-12-21T13:10:59+5:30

छोट्या पडद्यावरील 'भाभीजी घर पर हैं'ही मालिका दिवसेंदिवस रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या मालिकेत दिवसागणिक येणारे ट्विस्ट आणि ...

Vishnu Narayan will soon get a sperm donor to work for 'Bhabhiji' | 'भाभीजी'च्या विभूतीला मिळेना काम,पत्नीसाठी विभूती नारायण लवकरच बनणार स्पर्म डोनर

'भाभीजी'च्या विभूतीला मिळेना काम,पत्नीसाठी विभूती नारायण लवकरच बनणार स्पर्म डोनर

ट्या पडद्यावरील 'भाभीजी घर पर हैं'ही मालिका दिवसेंदिवस रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या मालिकेत दिवसागणिक येणारे ट्विस्ट आणि रंजक कथानक यामुळे मालिका लोकप्रिय ठरली आहे. यातील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. यापैकी एक खास आणि विशेष व्यक्तीरेखा म्हणजे विभूती नारायण. त्याची दरवेळेस काही ना काही फजिती होते आणि त्याची फजिती रसिकांना विशेष भावते. मात्र आता मालिकेत असं काही घडणार आहे की जे ऐकून तुम्हीसुद्धा चक्रावल्याशिवाय राहणार नाही. नल्ला अर्थात रिकामटेकडा म्हणून प्रसिद्ध असणारा विभूती नारायण मिश्रा आपल्या पत्नीसाठी काही तरी स्पेशल करणार आहे. कारण विभूती नारायण लवकरच स्पर्म डोनर बनणार आहे.

विभूती नारायण त्याची पत्नी अनिताच्या ग्रुमिंग क्लासेसेला आर्थिक मदत करण्यासाठी स्पर्म डोनर बनणार आहे.अनिता भाभी फक्त आर्थिक अडचणीतच नाही तर अनिता भाभीच्या घरातील पाणीही संपले आहे. आंघोळीलाही घरात पाणी शिल्लक नाही. या सगळ्या गोष्टींमुळे अनिता भाभी त्रस्त आहे. पाणी टंचाईचा सामना करणारे अनिता आणि विभूती नारायण तिवारीजीच्या घरी पोहोचतात, मात्र तिथेही त्यांना  आंघोळ करता येत नाही. अनिता भाभीवर लट्टू असणारे तिवारीजी त्यांच्या सख्ख्या शेजाऱ्यांना आपल्या बाथरुममध्ये आंघोळीसाठी जाऊ देत नाही आणि त्यासाठी विविध बहाणे करतात.यामुळे अनिता आणि विभूती नारायण यांना आंघोळीशिवाय आपल्या घरी परतावे लागते.त्यामुळे आता आगामी काळात भाभीजी घर पर हैं ही मालिका दिवसेंदिवस आणखी रंजक ठरणार आहे.खासकरुन यातील विभूती नारायण मिश्रा रसिकांचं आणखी मनोरंजन करत त्यांना खळखळून हसवणार असंच दिसत आहे.

Also Read:'अंगुरी भाभी' शुभांगी अत्रे करणार राजकारणात प्रवेश?मालिका सोडणार असल्याच्या चर्चांवर दिले असे उत्तर

सध्या शिल्पा शिंदे नंतर दुसरी अंगुरी भाभी बनलेली अभिनेत्री शुभांगी अत्रेही 'भाभीजी घर पर है' ही लोकप्रिय मालिका सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. सेलिब्रिटीचं निवडणूकीच्या मैदानात उतरणं... यांत आणखी एक मराठमोळं नाव जोडलं जाणार आहे. अभिनेत्री शुभांगी अत्रे राजकारणात प्रवेश करण्याची तयारी करत असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत.यावर शुभांगी राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा ख-या आहेत.मात्र ख-याखु-या आयुष्यात कोणती निवडणुक लढवणार नसून मालिकेत निवडणुक लवढवताना शुभांगी दिसणार आहे.त्यामुळे मालिकेची टीम नवीन अंगुरी भाभीच्या शोधात असल्याचे निव्वळ अफवा असल्याचे तिने म्हटले होते.

Web Title: Vishnu Narayan will soon get a sperm donor to work for 'Bhabhiji'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.