लग्नानंतर पहिल्यांदा टीव्हीवर दिसणार विराट आणि अनुष्काची जोडी एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 16:44 IST2018-02-07T11:14:15+5:302018-02-07T16:44:15+5:30
लग्नानंतर विरुष्काचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यांचे फोटो पाहून त्यांचे फॅन्स ही आनंदित होते. त्यांच्या फॅन्ससाठी आणखीन ...

लग्नानंतर पहिल्यांदा टीव्हीवर दिसणार विराट आणि अनुष्काची जोडी एकत्र
ल ्नानंतर विरुष्काचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यांचे फोटो पाहून त्यांचे फॅन्स ही आनंदित होते. त्यांच्या फॅन्ससाठी आणखीन एक खुशखबर आहे. लवकरच ही जोडी एक 'शो' मध्ये एकत्र येणार आहे. या शो चे नाव ही निश्चित झाले आहे
सध्या अनुष्का 'परी' आणि 'जीरो' या चित्रपटांच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे तर विराट दक्षिण आफ्रिकाच्या दौऱ्यावर आहे. त्यातच आता ह्या दोघांना टीव्ही वर बघायला प्रेक्षक उत्सूक झाले आहेत. आता आपण विचार करत असाल की शेवटी हे दोघेजण कुठल्या कार्यक्रमात येणार आहे तर हे दोघे जण 'कॉफी विथ करण" च्या ६व्या सिजनमध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे. या शो चे काम जोरात चालू असून मेकर्स सध्या सूत्रधाराच्या शोधात आहे.
खरंतर या शो चे पाहिले ५ सिजनचा होस्ट करण जोहर होता. एवढेच काय तर शो चे नाव सुद्धा त्याच्याच नावाने होते पण करण सध्या चित्रपटामध्ये व्यस्त असल्यामुळे त्याने अजून या शोसाठी होकार कळवला नाहीयं. अनुष्का आधी ह्या शो मध्ये येऊन गेली आहे ती मात्र तेव्हा ती अभिनेत्री कॅटरिना कैफ बरोबर आली होती. ह्या वेळी शो चे मेकर्स अनुष्का आणि विराट या नवविवाहित जोडीला घेऊन यायच्या प्रयत्नात आहेत. आता जर हे यशस्वी झाले तर प्रेक्षकांसाठी हा डबल डोस असेल ह्यात शंकाच नाही.
ALSO READ : ‘परी’चा आणखी एक टीजर! भल्याभल्यांना फुटेल घाम!!
परी हा चित्रपट अनुष्का तिचा भाऊ करनेश शर्मासोबत हा चित्रपट बनवते आहे. प्रोसित रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. बंगाली स्टार परमब्रता चॅटर्जी यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तूर्तास अनुष्का ‘परी’च्या शूटींगसोबतच आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटाच्या शूटींगमध्येही व्यस्त आहे.