विकास मनकतलाने का थांबवले गुलामचे चित्रीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 11:44 IST2017-05-23T06:14:07+5:302017-05-23T11:44:07+5:30
गुलाम या मालिकेत विकास मनकतला वीर ही भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान नुकताच विकास प्रचंड चिडला असल्याने ...
.jpg)
विकास मनकतलाने का थांबवले गुलामचे चित्रीकरण
ग लाम या मालिकेत विकास मनकतला वीर ही भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान नुकताच विकास प्रचंड चिडला असल्याने अनेक तास चित्रीकरण थांबवावे लागले. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेची कथा, यातील व्यक्तिरेखा यामुळे ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या मालिकेच्या कथानकाला आता एक वेगळे वळण मिळणार आहे. पण मालिकेच्या कथानकाला दिलेले वळण या मालिकेत वीरची भूमिका साकारणारा विकासला आवडलेले नाहीये आणि त्याने मालिकेच्या टीमला याबाबत तसे सांगितले देखील आहे.
विकास मनकतला आणि मालिकेच्या दिग्दर्शकाची मालिकेच्या सेटवर नुकतीच चांगलीच बाचाबची झाली. यामुळे मालिकेचे चित्रीकरण कित्येक तास थांबवण्यात आले. मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना एका दृश्यात रंगीला म्हणजेच परम सिंह वीर म्हणजेच विकास मनकतलाला घाबरवतो असे दाखवायचे होते. पण या दृश्यामुळे विकासच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. या दृश्यानंतर रंगीला ही व्यक्तिरेखा त्याच्या व्यक्तिरेखेवर भारी पडेल असे त्याचे म्हणणे होते. यावरून विकासने मालिकेच्या दिग्दर्शकांसोबत प्रचंड भांडणे केली. एवढेच नव्हे तर लेखकाचे ऐकण्यासदेखील त्याने नकार दिला आणि तो मालिकेच्या सेटवरून निघून गेला. या सगळ्यामुळे अनेक तास मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले. त्यानंतर मालिकेच्या निर्मात्यांना या सगळ्यात मध्यस्थी करावी लागली. त्यांनी विकास आणि दिग्दर्शक यांच्यासोबत अनेक तास चर्चा करून त्यांच्यात असलेले मतभेद दूर केले. यानंतर विकासने दिग्दर्शकाची माफी मागितली आणि सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या. पण या सगळ्यामुळे गुलाम मालिकेला काय वळण मिळणार आहे, ज्यामुळे विकास इतका नाराज झाला आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.