Video: विजय पाटकरांच्या पत्नीने नाइलाजाने दिला लग्नाला होकार? पाहा त्यांच्या लग्नाचा हा मजेशीर किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 05:15 PM2021-12-22T17:15:00+5:302021-12-22T17:15:00+5:30

Vijay patkar: कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असणाऱ्या विजय पाटकर यांनी अलिकडेच 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

Vijay Patkar's wife agrees to marry Nilaja? Look at this funny story of their marriage | Video: विजय पाटकरांच्या पत्नीने नाइलाजाने दिला लग्नाला होकार? पाहा त्यांच्या लग्नाचा हा मजेशीर किस्सा

Video: विजय पाटकरांच्या पत्नीने नाइलाजाने दिला लग्नाला होकार? पाहा त्यांच्या लग्नाचा हा मजेशीर किस्सा

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील विजय पाटकर (vijay patkar) हे नाव कोणत्याही प्रेक्षक वर्गासाठी नवीन नाही. मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारे विजय पाटकर आजच्या घडीला लोकप्रिय कलाकारांच्या यादीत कायम अग्रस्थानावर असतात. 'चंगू मंगू', 'हमाल दे धमाल', 'सोनियाची मुंबई' असे कितीतरी त्यांचे चित्रपट गाजले. विशेष म्हणजे कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असणाऱ्या विजय पाटकर यांनी अलिकडेच 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांच्या पत्नीने एक मजेशीर किस्सा शेअर केला.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर होम मिनिस्टरचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये विजय पाटकर यांच्या पत्नी त्यांच्या लग्नाचा एक धम्माल किस्सा सांगताना दिसत आहेत. विशेष म्हणजे लग्नात मुलाची पसंती करायला वेळच मिळाला नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यांचं हे वाक्य ऐकल्यावर विजय पाटकर यांच्यासह सगळेच हसू लागले.

"मी ऑफिसमध्ये असतांना हे मला पाहून गेले. पण त्याच्यानंतर मी चार दिवस बाहेर गेले होते. त्यामुळे घरी कोणाला काही सांगितलं नाही. की मुलगा आवडलाय की नाही. फक्त मला त्यावेळी त्याचा गांधी स्टाइलचा चष्मा आवडला होता. आणि, मुख्य म्हणजे मला मिशी असलेला नवरा मुलगा हवा होता", असं विजय पाटकरांच्या पत्नी म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "तर.. बाहेरुन आल्यानंतर मी घरी एकटीच होते. माझे आई-वडील बाहेर गेले होते आणि मी बाहेरुन आल्यामुळे सगळं सामान आवरत होते. तितक्या हे दोघं ( सासू-सासरे) समोरुन आले. आता ते आले आहेत तर मग नाही कसं म्हणणार. मग हो म्हणाले."

दरम्यान, सध्या विजय पाटकर आणि त्यांच्या पत्नीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विजय पाटकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून त्यांनी अनेक गाजलेल्या हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच ते अनेक नाटकांमध्येही झळकले आहेत.
 

Web Title: Vijay Patkar's wife agrees to marry Nilaja? Look at this funny story of their marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.