नन बनलेल्या सोफिया हयातच्या शाही विवाहाचे पहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2017 11:24 AM2017-04-25T11:24:06+5:302017-04-25T16:57:19+5:30

बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोची एक्स कंटेस्टेंट अन् आता नन बनलेल्या सोफिया हयात हिने आपल्या बॉयफ्रेण्ड रोमानियामधील इंटेरियर डिझायनर ...

View of Shahi Marriage of Sofia Hayat | नन बनलेल्या सोफिया हयातच्या शाही विवाहाचे पहा फोटो!!

नन बनलेल्या सोफिया हयातच्या शाही विवाहाचे पहा फोटो!!

googlenewsNext
ग बॉस या रिअ‍ॅलिटी शोची एक्स कंटेस्टेंट अन् आता नन बनलेल्या सोफिया हयात हिने आपल्या बॉयफ्रेण्ड रोमानियामधील इंटेरियर डिझायनर व्लाड स्टॅनेस्कूसोबत अतिशय शाही पद्धतीने विवाह रचला आहे. गेल्या सोमवारी लंडन येथे पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्याचे आता अनेक फोटोज् समोर आले आहेत. ज्यामध्ये नवरी सोफिया नवरदेव व्लाड खूपच सुंदर दिसत आहेत. 



यावेळी सोफियाने सोनेरी रंगाचा गाउन परिधान केलेला असून, तिचे संपूर्ण शरीर ज्वेलरीने मढलेले आहे, तर व्लाड आॅफ व्हाइट रंगाच्या शेरवानीमध्ये बघावयास मिळत आहे. ज्यामुळे दोघेही ‘मेड फॉर इच अदर’ वाटत आहेत. सोफियाने मार्च महिन्याच्या अखेरीस साखरपुड्याची घोषणा केली होती. यावेळी तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज्देखील शेअर केले होते. 



त्यानंतर तिने खास आपल्या फॅन्ससाठी प्री-वेडिग फोटोशूटही केले होते, जे प्रचंड व्हायरल झाले होते. या प्री-वेडिग फोटोशूटमध्ये सोफिया तिच्या पतीसोबत अंडरगार्मेंट्स घातलेली दिसत होती. आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा सोफियाने लिप-लॉक करतानाचे काही फोटोज् पोस्ट केले होते. 



दोन वर्षांपूर्वी सोफियाने अचानकपणे नन बनल्याची घोषणा करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. ज्यामुळे तिने तिचे सिलिकॉन ब्रेस्टही रिमूव केले होते. यावेळी सोफियाने खुलासा केला होता की, रिलेशनशिपमध्ये त्रास सहन केल्यानंतरच मी नन बनण्याचा निर्णय घेतला. तसेच तिने हेही स्पष्ट केले होते की, तिने रातोरात नन बनण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तिने आयुष्यात कधीही लग्न, सेक्स आणि मुलांना जन्म देणार नसल्याचेही जाहीरपणे सांगितले होते. 



याच अनुषंगाने जेव्हा तिला एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आले होते तेव्हा तिने अतिशय चतुराईने उत्तर देताना म्हटले होते की, त्यावेळेस माझी परिस्थिती तशी होती, आज माझी परिस्थिती अशी आहे. आता सोफिया लग्न केल्यानंतर तरी सुखाने संसार करणार काय? हे बघणे मजेशीर ठरेल. 



ALSO READ :​सोफिया हयात अडकली विवाहबंधनात

Web Title: View of Shahi Marriage of Sofia Hayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.