​दिव्यांका त्रिपाठीने नच बलिये तालमीदरम्यानचा व्हिडिओ केला पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 12:22 IST2017-04-27T06:27:48+5:302017-04-27T12:22:28+5:30

नच बलिये या कार्यक्रमात दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे स्पर्धक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरे तर ते ...

The video was posted by Divyanka Tripathi, during a breakthrough | ​दिव्यांका त्रिपाठीने नच बलिये तालमीदरम्यानचा व्हिडिओ केला पोस्ट

​दिव्यांका त्रिपाठीने नच बलिये तालमीदरम्यानचा व्हिडिओ केला पोस्ट

बलिये या कार्यक्रमात दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे स्पर्धक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरे तर ते दोघेही ये है मोहोब्बते या त्यांच्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. पण तरीही त्यातून वेळ काढून ते या कार्यक्रमासाठी तालमी करत आहेत. त्यांचे खूप चांगले परफॉर्मन्स आतापर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. ते दोघे खूप चांगले डान्सर असल्याचे परीक्षकांचेदेखील म्हणणे आहे.
दिव्यांका आणि विवेक दर आठवड्याला एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स सादर करत प्रेक्षकांचे आणि परीक्षकांचे मन जिंकत आहेत. पण या आठवड्यात दिव्यांका तिचा परफॉर्मन्स सादर करू शकली नाही. तिला दुखापत झाल्यामुळे एक आठवडा तिने या कार्यक्रमापासून दूर राहाणे पसंत केले आहे. यामुळे तिच्या फॅन्सना खूपच वाईट वाटले. पण काही लोकांच्या मते तिला परफॉर्मन्स करायचाच नसल्याने तिने दुखापत हे कारण पुढे केले. अनेकांनी सोशल मीडियावरदेखील याबाबत कमेंट केले होते. पण अशा लोकांना कसे उत्तर द्यायचे हे दिव्यांकाला चांगलेच माहीत आहे. दिव्यांकाने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आणि विवेक तू चीज बडी है मस्त मस्त या गाण्यावर नृत्याची तालीम करत असताना आपल्याला दिसत आहे. या व्हिडिओला तिने कॅप्शनदेखील खूपच चांगली लिहिली आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, माझा परफॉर्मन्स ज्यांना मागच्या आठवड्यात पाहायचा होता. त्यांच्यासाठी मी हा खास तालमीचा व्हिडिओ पोस्ट करत आहे. मी माझ्या दुखापतीचे खोटे कारण पुढे केले असे म्हणणाऱ्या लोकांसाठी हे उत्तर आहे. या तिच्या व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केले आहे. 
   
 

Web Title: The video was posted by Divyanka Tripathi, during a breakthrough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.