VIDEO : पिलाला वाचविण्यासाठी उंदराचा सापावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 22:25 IST2016-07-05T16:55:52+5:302016-07-05T22:25:52+5:30
मातृत्व किती महान असते, याचे कित्येक उदाहरणे आपण आतापर्यंत पाहिले असतील.

VIDEO : पिलाला वाचविण्यासाठी उंदराचा सापावर हल्ला
म तृत्व किती महान असते, याचे कित्येक उदाहरणे आपण आतापर्यंत पाहिले असतील. मात्र या उंदीराचे मातृत्व पाहून आपण चकितच व्हाल. आपल्या पिलाला सापाच्या तावडीतून सोडविण्यासाठी उंदराने चक्क सापावरच हल्ला चढविला. याचा व्हिडीओ सध्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत भक्ष्याच्या शोधात असणाºया सापाने एका उंदराच्या पिल्लाला तोंडात घेतल्याचे दिसते. त्यानंतर आपल्या पिल्लाची या सापाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी उंदराने चक्क सापावर झडप घातली. सापाने तोंडातील भक्ष सोडून या उंदराबरोबर संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिल्लासाठी लढणाºया मातेसमोर साप मैदानातून पळ काढताना या व्हिडिओत दिसत आहे. आपल्या लेकरावर संकट आल्यास प्राणीदेखील जीवाची बाजी लावायला तयार असतात, याची प्रचिती या व्हिडिओतून तुम्हाला नक्की येईल.