विघ्नहर्ता गणेश या मालिकेत बसंत भट्ट दिसणार कार्तिकेयच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 11:57 IST2017-08-02T06:27:27+5:302017-08-02T11:57:27+5:30

विघ्नहर्ता गणेश या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. या मालिकेचा सेट अतिशय भव्य असणार असून चित्रीकरणासाठी  प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात ...

Vasanthta Ganesh plays the role of Kartikeya Basant Bhatt in this series | विघ्नहर्ता गणेश या मालिकेत बसंत भट्ट दिसणार कार्तिकेयच्या भूमिकेत

विघ्नहर्ता गणेश या मालिकेत बसंत भट्ट दिसणार कार्तिकेयच्या भूमिकेत

घ्नहर्ता गणेश या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. या मालिकेचा सेट अतिशय भव्य असणार असून चित्रीकरणासाठी  प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या मालिकेत गणपती बाप्पाची भूमिका उझैर बसर साकारत असून त्याने याआधी अनेक पौराणिक मालिकांमध्ये काम केले आहे. तो सिया के राम या मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने लवची भूमिका साकारली होती. या त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. तसेच त्याने सूर्यपुत्र करण या मालिकेत देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. विघ्नहर्ता गणेश या मालिकेचे बजेट हे जवळजवळ 300 कोटी असून या मालिकेच्या चित्रीकरणासाठी खूप वेगवेगळ्या कॅमेऱ्यांचा वापर केला गेला आहे.
विघ्नहर्ता गणेश या मालिकेत कार्तिकेयची भूमिका साकारण्यासाठी बसंत भट्टची निवड करण्यात आली आहे. बसंतने याआधी सूर्यपूत्र कर्ण मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. बसंतने शाळेत असतानाच अभिनयाला सुरुवात केली. त्याला अभिनयक्षेत्राविषयी आवड असल्याने तो अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असे. त्याने कॉलेजमध्ये गेल्यावर अनेक कार्यक्रमांसाठी ऑडिशन्स दिल्या. तसेच त्याने काही नाटकांमध्येदेखील काम केले. नाटकांमध्ये काम केल्यानंतर तो मालिकांकडे वळला. विघ्नहर्ता गणेश या मालिकेसाठी तो खूपच उत्सुक आहे. याविषयी तो सांगतो, विघ्नहर्ता गणेश या मालिकेतील माझी भूमिका खूपच वेगळी आहे. भगवान कार्तिकेयाची तत्वे आणि मुल्ये मला नेहमीच जवळची वाटतात. स्वावलंबी असणे, कर्तव्यनिष्ठ असणे यांसारखे त्यांचे गुण मला खूप आवडतात. 
विघ्नहर्ता गणेश या मालिकेत प्रेक्षकांना माता-पित्याचे आपल्या मुलांशी असलेले आगळे वेगळे नाते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Also Read : विघ्नहर्ता गणेश या मालिकेचे बजेट तब्बल 300 कोटी

Web Title: Vasanthta Ganesh plays the role of Kartikeya Basant Bhatt in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.