माझ्या नवऱ्याची बायकोतील सौमित्रची आई आहे एकेकाळची मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 13:43 IST2019-10-10T13:39:10+5:302019-10-10T13:43:54+5:30
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत नुकतीच सौमित्रच्या आईची एंट्री झाली असून सौमित्रची आई प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे.

माझ्या नवऱ्याची बायकोतील सौमित्रची आई आहे एकेकाळची मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ही?
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला आज इतकी वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या मालिकेती राधिका, गुरू, शनाया हे सगळेच प्रेक्षकांचे प्रचंड आवडते आहेत. ही मालिका आजही टिआरपी रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच लागलेली असते. या मालिकेत आता नवीन ट्विस्ट आला असून राधिका सौमित्रसोबत लग्न करायला तयार झाली आहे. या मालिकेत नुकतीच सौमित्रच्या आईची एंट्री झाली असून सौमित्रची आई प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत सौमित्रच्या आईच्या भूमिकेत आपल्याला वंदना पंडित यांना पाहायला मिळत आहे. वंदना पंडित यांनी अनेक वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध चित्रपटामध्ये काम केले होते. या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले होते. तसेच या चित्रपटातील सगळी गाणी देखील प्रचंड गाजली होती. आता अनेक वर्षांनंतर वंदना पंडित यांनी अभिनयक्षेत्रात कमबॅक केला आहे. सचिन पिळगांवकर यांची मुख्य भूमिका असलेला अष्टविनायक हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटात वंदना पंडित यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अष्टविनायका तुझा महिमा कसा... हे गाणे आज इतक्या वर्षांनी देखील तितकेच फेमस आहे. या गाण्यात आपल्याला वंदना पंडित यांना पाहायला मिळाले होते. त्या चित्रपटामुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटाला आज इतकी वर्षं झाले असले तरी वंदना पंडित या प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत.
अष्टविनायक हा चित्रपट सत्तरीच्या दशकात प्रेक्षकांच्या भेटीस आला होती. आता तब्बल 40 वर्षांनंतर त्या अभिनयक्षेत्रात परतल्या असून त्यांनी छोट्या पडद्याद्वारे कमबॅक केला आहे. वंदना पंडित यांचे लग्नानंतरचे आडनाव शेठ असून त्या आपल्या कुटुंबियांसोबत पुण्यात राहातात.