डान्स चॅम्पियन्समध्ये वैभवी मर्चंटने रेमो डिसुझा आणि टेरेन्स लुईस यांना शिकवले नृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 16:50 IST2017-09-29T11:20:21+5:302017-09-29T16:50:21+5:30
‘स्टार प्लस’ वाहिनीवर डान्स प्लस हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या कार्यक्रमाच्या ...
.jpg)
डान्स चॅम्पियन्समध्ये वैभवी मर्चंटने रेमो डिसुझा आणि टेरेन्स लुईस यांना शिकवले नृत्य
‘ ्टार प्लस’ वाहिनीवर डान्स प्लस हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या कार्यक्रमाच्या यशानंतर डान्स चॅम्पियन्स हा डान्स रिअॅलिटी शो प्रेक्षकांना स्टार प्लस या वाहिनीवरच पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना देशभरातील एकापेक्षा एक उत्कृष्ट डान्सरचे नृत्य पाहण्याची संधी मिळणार आहे.
‘स्टार प्लस’वरील ‘डान्स चॅम्पियन्स’ या आगामी नृत्यविषयक रिअॅलिटी कार्यक्रमात रेमो डिसुझा आणि टेरेन्स लुईस हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. रेमो आणि टेरेन्स यांची जोडी आपल्याला डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमात पाहायला मिळाली होती. या कार्यक्रमाने इंडस्ट्रीला खूप चांगले डान्सर मिळवून दिले आहेत. डान्स चॅम्पियन्स या कार्यक्रमासाठी नुकतेच ऑडिशन्स घेण्यात आले असून या ऑडिशन्समधील स्पर्धकांतून सर्वोत्कृष्ट नर्तक कोण ठरणार हे रेमो आणि टेरेन्स दोघे मिळून ठरवणार आहेत. प्रेक्षकांशी संवाद साधण्याची खूपच चांगली शैली राघव जुयालची आहे. तसेच त्याच्या कॉमेडी टायमिंगचे देखील कौतुक केले जाते. राघवने डान्स प्लस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. आता तो डान्स चॅम्पियन्स या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका साकारणार आहे. देशभरातील सर्वोत्कृष्ट नर्तक या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाले असून या कार्यक्रमाच्या नुकत्याच चित्रीत झालेल्या भागात नृत्यदिग्दर्शिका वैभवी मर्चंट हिने हजेरी लावली होती. तिने कजरा रे या गाण्यावर नृत्य सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. एवढेच नव्हे तर कजरा रे या गाण्यावर वैभवीने रेमो आणि टेरेन्स यांना नृत्य देखील शिकवले.
वैभवीने नृत्यदिग्दर्शित केलेले कजरा रे हे गाणे प्रचंड प्रसिद्ध असून या गाण्यावर ऐश्वर्या रायने नृत्य सादर केले होते.
आजघडीला या क्षेत्रातील एखादा नृत्यदिग्दर्शक दुसऱ्या नृत्यदिग्दर्शकाचे त्याच्या उत्तम कामगिरीबद्दल क्वचितच कौतुक करताना दिसतो असे सांगत रेमो म्हणाला की, आपण दिग्दर्शित केलेले एखादे नृत्य आवडल्यास वैभवी मला तात्काळ फोन करून माझे अभिनंदन करते. अशी माणसे इंडस्ट्रीत दुर्मिळ आहेत.
Also Read : रिद्धिमा पंडित ‘डान्स चॅम्पियन्स’मध्ये करणार सहसूत्रसंचालन