'प्रोटीनके डबे में कही चूरन तो नही?' उत्कर्षने लगावला टोला! नॉमिनेशनमध्ये वैभव घाबरला?

By देवेंद्र जाधव | Updated: August 23, 2024 08:54 IST2024-08-23T08:54:09+5:302024-08-23T08:54:09+5:30

काल बिग बॉसच्या घरात जो नॉमिनेशन टास्क झाला त्यात वैभवने घातलेल्या गोंधळामुळे उत्कर्ष शिंदेने दोन वाक्यात वैभवला टोला लगावलाय (bigg boss marathi 5)

vaibhav chavan fear of nomination in bigg boss marathi 5 utkarsh shinde post | 'प्रोटीनके डबे में कही चूरन तो नही?' उत्कर्षने लगावला टोला! नॉमिनेशनमध्ये वैभव घाबरला?

'प्रोटीनके डबे में कही चूरन तो नही?' उत्कर्षने लगावला टोला! नॉमिनेशनमध्ये वैभव घाबरला?

बिग बॉस मराठीच्या घरात चौथा आठवडा सुरु झालाय. या चौथ्या आठवड्यात घरात पुन्हा एकदा जोरदार राडा झालेला बघायला मिळाला. काल बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन टास्क झाला. या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याच्या गळ्यात एका सदस्याचा फोटो देण्यात आला. बझरचा आवाज झाल्यावर हा फोटो चुलीत टाकून प्रत्येकी एका सदस्याला नॉमिनेट करायचं होतं. यावेळी अभिजीतने नॉमिनेट केल्याने वैभवचा चांगलाच राग अनावर झाला होता. त्यामुळे बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक आणि गायक उत्कर्ष शिंदेने वैभवला टोला लगावलाय. 

वैभवबद्दल उत्कर्ष काय म्हणाला?

उत्कर्षने वैैभवचा फोटो शेअर केलाय. हा फोटो पोस्ट करुन उत्कर्ष लिहितो, "प्रोटीनके डबे में कही चूरन तो नही खा रहे है? अरे ये तो नॉमिनेशनसे डरे जा रहे हैं" अशी पोस्ट करुन उत्कर्षने वैभवला टोला लगावलाय. काल नॉमिनेशनच्या वेळी जेव्हा अभिजीतने वैभवचं नाव चुलीत टाकायचा निर्णय घेतला तेव्हा वैभव - अभिजीतमध्ये वादावादी झाली. जेव्हा अभिजीतने वैभवचा फोटो खरंच चुलीत टाकला तेव्हाही वैभव अभिजीतवर भडकलेला दिसला.

हे सदस्य या आठवड्यात नॉमिनेट

बिग बॉस मराठीच्या घरात काल चौथ्या आठवड्यातलं नॉमिनेशन कार्य पार पडलं. या कार्यात सदस्यांनी फोटो चुलीत टाकल्याने वैभव चव्हाण, इरिना रुडाकोव्हा, आर्या जाधव आणि अभिजीत सावंत हे चौघेजण नॉमिनेट झाले. या चौघांपैकी आता नॉमिनेट कोण होणार, याकडे सर्वांची उत्सुकता आहे. दरम्यान अभिजीत सावंतमुळे A ग्रुप म्हणजेच निक्की, अरबाज, वैभव आणि जान्हवीमध्ये फूट पडलेली दिसूुन येतेय.

Web Title: vaibhav chavan fear of nomination in bigg boss marathi 5 utkarsh shinde post