"महाराजांची आणि मावळ्यांची क्रेझ या मॉडर्न पिढीत...", पुतणीचा किल्ला बनवतनाचा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 06:47 PM2023-11-14T18:47:32+5:302023-11-14T18:52:37+5:30

उत्कर्ष शिंदेने पुतणीबरोबर दिवाळीच्या निमित्ताने किल्ला बनवला आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

utkarsh shinde shared video on killa making diwlai celebration post viral | "महाराजांची आणि मावळ्यांची क्रेझ या मॉडर्न पिढीत...", पुतणीचा किल्ला बनवतनाचा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षची पोस्ट

"महाराजांची आणि मावळ्यांची क्रेझ या मॉडर्न पिढीत...", पुतणीचा किल्ला बनवतनाचा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षची पोस्ट

देशात सर्वत्रच दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. दिवाळीत अनेक ठिकाणी किल्ले बनवण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. घराच्या बाहेरही किल्ले बनवत महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपली जाते. गायक उत्कर्ष शिंदेनेही पुतणीबरोबर दिवाळीच्या निमित्ताने किल्ला बनवला आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याबरोबरच त्याने सविस्तर पोस्टही लिहिली आहे. या पोस्टमधून उत्कर्षने महत्त्वाचा संदेशही दिला आहे. 

उत्कर्ष शिंदेची पोस्ट

मातीत कस राहिला नाही तर पिक कसदार येत नाही...
आजची पिढी संस्कृती विसरत चाललीये असे कैक लोक सऱ्हास म्हणताना ऐकू येतात.पण ,त्यातले किती जण तीच पिढी घडविण्यासाठी आपला वेळ देतात? किती जण लहान मुलांच्या प्रश्नांना शांतपणे बालिश न म्हणता समजुतदारपणे उत्तरं देतात? आणि किती जण मीच खूप बिझी असतो हे उतर देऊन पळ काढण्यापेक्षा त्या लहानग्या मुलांना संस्कार घडविण्यासाठी प्रयत्नशील असतात? 

हातात मोबाईल दिला आणि आपल्या मागची कीटकीट संपली असा मानणाऱ्यानो. हे लक्षात ठेवा. “मातीत कस राहिला नाही ना तर पिक कसदार येत नाही” महाराष्ट्र हे सणांचं संस्कृतीने नटलेलं राज्य...लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला या सणांची, उत्सवाची ओढ असते. या उत्सवादरम्यानच्या, अनेक प्रथा-परंपरा प्रचलित आहे. लहान मुलांसाठी तर हा सण आनंदाच्या पर्वणीपेक्षा कमी नाही. दीपदानत्सव असो की दीपावली की पडवा. ह्या सर्व गोष्टींची माहिती देणं ह्या ओल्या मातीला आकार देऊन सुंदर मूर्ती घडविण्याचं काम आपलं नाही का? ह्या सणात किल्ले तयार करण्याची आपल्या महराजांची आपल्या मावळ्यांची शोर्या गाथा त्यांचे ह्या मॉडर्न पिढीत “क्रेझ “आपण निर्माण नाही करायचे का? की स्पायडर मैन,आयर्न मैन हेच त्यांच्या मनावर बिंबवू द्यायचे ? आपल्या पूर्वजांनी केलेला इतिहास न वाचता न समजून घेता नवा इतिहास ह्या नव्या पिढ्यांना घडवता येईल का?

काल माझी पुतणी आंतरा आदर्श शिंदेसोबत गावी किल्ला सजावट करत बरंच काही चर्चा करत शिकवता आलं.आमच्या शिंदेशाही परिवारात थोर पुरुषांचे विचार वाचण्यावर त्यावर विज्ञानवादी चर्चा करण्यावर जास्त भर दिला जातो.आणि मी घरी असलो की मैदानी खेळ क्रिकेट पकडा पकडी,ट्रेकिंग ,मुलानबरोबर डांस,फाइटिंग टास्क,ड्रॉइंग पेंटिंग मस्ती सुरू राहते. आपली एनर्जी डबल होतेच पण त्यांना ही त्यांच लहानपण छान एंजॉय करता येतं.आपली पिढी हसत खेळत मज्जा करत वाढू द्या.आज ह्या चिल्ड्रन्स डे निम्मिताने आपली पिढी विज्ञानवादी घडवूया .लक्ष्यात ठेवा “पिढीया पढेंगी तभी अगे बढेंगी”

उत्कर्षची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. उत्कर्ष पेशाने डॉक्टर आहे. 'बिग बॉस मराठी'मध्येही तो सहभागी झाला होता. लवकरच तो 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटात तो ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: utkarsh shinde shared video on killa making diwlai celebration post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.