मालिकाविश्वात पहिल्यांदाच AIचा वापर, 'तू भेटशी नव्याने'मध्ये सुबोध भावे दिसणार विशीतला तरूण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 03:43 PM2024-05-09T15:43:56+5:302024-05-09T15:44:44+5:30

Subodh Bhave : सुबोध भावे मालिकाविश्वात पुनरागमन करतो आहे. सोनी मराठी वाहिनीवरील तू भेटशी नव्याने मालिकेत तो दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Using AI for the first time in serial world, Subodh Bhave will be seen in 'Tu Bhetshi Navyane', a young man in his twenties | मालिकाविश्वात पहिल्यांदाच AIचा वापर, 'तू भेटशी नव्याने'मध्ये सुबोध भावे दिसणार विशीतला तरूण

मालिकाविश्वात पहिल्यांदाच AIचा वापर, 'तू भेटशी नव्याने'मध्ये सुबोध भावे दिसणार विशीतला तरूण

अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. सुबोध आतापर्यंत गाजलेले चित्रपट, विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने साकारलेल्या विविध व्यक्तिरेखांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. दरम्यान आता सुबोध मालिकाविश्वात पुनरागमन करतो आहे. सोनी मराठी वाहिनीवरील तू भेटशी नव्याने मालिकेत तो दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

तू भेटशी नव्याने मालिकेत सुबोध भावे व्यतिरिक्त अभिनेत्री शिवानी सोनार पाहायला मिळणार आहे. या प्रोमोत आपल्याला  सुबोधच्या दोन व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहेत. अभिमन्यू आणि माही अशी त्या व्यक्तिरेखांची नावं आहेत. ऐन चाळीशीतील अभिमन्यू सर कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहेत तर ऐन विशीतला तरुण सुबोधही या मालिकेत दिसणार आहे. त्या व्यक्तिरेखेचं नाव माही आहे आणि AI च्या माध्यमातून हा तरुण सुबोध दाखविला जाणार आहे. अशा प्रकारे साकारलेली एक व्यक्तिरेखा छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच सादर केली जाणार आहे आणि हे पहिलं पाऊल सोनी मराठी वाहिनीने उचलले आहे.


AI चा वापर करून या मालिकेतील व्यक्तिरेखा साकारली जाणार असल्याने ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेमुळे मालिका जगतात वेगळीच चर्चा निर्माण झाली आहे.  २५ वर्षांपूर्वीचा सुबोध आणि आत्ताचा सुबोध अशा व्यक्तिरेखा दिसणार आहेत आणि ही एक प्रेमकथाही आहे. यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरेल यात शंका नाही.

Web Title: Using AI for the first time in serial world, Subodh Bhave will be seen in 'Tu Bhetshi Navyane', a young man in his twenties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.