उर्मिला कोठारेने सोडली 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका? आता अभिनेत्रीने स्वत:केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 11:08 AM2022-06-04T11:08:50+5:302022-06-04T11:37:23+5:30

'मी गीत गात आहे' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री उर्मिला कोठारे (urmila kothare) हिने तब्बल १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. काही दिवसांतच मालिकेतून उर्मिला एक्झिट घेणार अशी चर्चा होती.

Urmila Kothare exit from tuzech me geet gaat aahe serial ?, Now the actress has revealed herself | उर्मिला कोठारेने सोडली 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका? आता अभिनेत्रीने स्वत:केला खुलासा

उर्मिला कोठारेने सोडली 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका? आता अभिनेत्रीने स्वत:केला खुलासा

googlenewsNext

काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहवर तुझेच 'मी गीत गात आहे' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री उर्मिला कोठारे (urmila kothare) हिने तब्बल १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. स्वरा आणि वैदेही या मायलेकींची कथा सांगणारी ही मालिका पहिल्या भागापासून लोकप्रिय झाली. मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी उर्मिला या मालिकेतून एक्झिट घेणार अशी चर्चा होती. मात्र आता यावर अभिनेत्रीने स्वत: खुलासा केला आहे.

उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून उर्मिलाने खुलासा केला आहे की तिने ही मालिका सोडलेली नाही. तुझेच मी गीत गाता आहे ही मालिका मी सोडल्याच्या अफवा पसरल्या जात आहेत. तर कृपया अस करु नका. लेखकाने लिहिलेल्या गोष्टीनुसार मालिका पुढे जातेय. त्यामुळे लेखकाने लिहिलेल्या स्क्रिप्टनुसार मालिका चालली आहे.  स्वराच्या आठवणीत मी तुला दिसत राहणार असल्याचे तिने सांगितलं आहे. 

'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत उर्मिला, वैदेही ही भूमिका साकारत आहे. मालिकेत वैदेही या पात्राचं निधन दाखवण्यात आल्याने तिची भूमिका साकारणाऱ्या उर्मिला कोठारेने ही मालिका सोडल्याची चर्चा रंगली होती, मात्र आता यावर अभिनेत्रीनेच खुलासा करून आपण ही मालिका सोडत नसल्याचं सांगितलं आहे. 
 

Web Title: Urmila Kothare exit from tuzech me geet gaat aahe serial ?, Now the actress has revealed herself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.