मुस्लिम अभिनेत्री गुडघे टेकवत चढली मंदिराच्या पायऱ्या, VIDEO पाहून चाहत्यांना बसला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 18:35 IST2025-05-05T18:32:55+5:302025-05-05T18:35:45+5:30

सारा अली खान आणि नुसरत भरुचानंतर 'ही' मुस्लिम अभिनेत्री चर्चेत, 'महादेव'ची आहे निस्सिम भक्त

Urfi Javed Climbed Babulnath Mandir In Mumbaion Knees Viral Video 2025 | मुस्लिम अभिनेत्री गुडघे टेकवत चढली मंदिराच्या पायऱ्या, VIDEO पाहून चाहत्यांना बसला धक्का!

मुस्लिम अभिनेत्री गुडघे टेकवत चढली मंदिराच्या पायऱ्या, VIDEO पाहून चाहत्यांना बसला धक्का!

Urfi Javed Climbed Babulnath Mandir: सतत विचित्र फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणजे उर्फी जावेद. ती कोणत्या ना कोणत्या कारणाने सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आता  उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण वेगळं आहे.  उर्फीचा मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात गुडघे टेकवत पायऱ्या चढतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये उर्फीने पारंपरिक वेशभूषा परिधान केली दिसून येत आहे.  तिच्या डोक्यावर ओढणीदेखील घेतलेली आहे. उर्फी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीनं मंदिराच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. उर्फी जितकी ग्लॅमरस आहे तितकीच ती अध्यात्माशी देखील जोडलेली असल्याचं दिसून येतंय.  स्टायलिश अंदाजमध्ये हजेरी लावून आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवणारी उर्फी पारंपारिक लूकमध्ये दिसल्यानं तिचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.


उर्फीने याआधीही धार्मिक स्थळांना भेट दिलेली आहे. जानेवारी २०२५ मध्ये तिने राजस्थानमधील कंबेश्वर महादेव मंदिराच्या ४०० पायऱ्या चढून दर्शन घेतलं होतं. धर्माबाबत उर्फी जावेदनं स्पष्ट भूमिका घेतलेली दिसून आली आहे.  इस्लाम धर्मात विश्वास ठेवत नाही आणि ती कधीही मुस्लिम व्यक्तीशी लग्न करणार नाही, असं तिनं अनेक मुलाखतींमध्ये म्हटलं आहे.


उर्फीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती आता  टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा बनली आहे. ती टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा आहे. ती 'बिग बॉस ओटीटी १' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकली होती. तर २०२४ मध्ये ती 'LSD 2' या चित्रपटात दिसली होती. याशिवाय 'फॉलो कर लो यार' ही तिची वेब सिरीज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौची रहिवासी असलेली उर्फी ही फक्त २७ वर्षांची आहे.

Web Title: Urfi Javed Climbed Babulnath Mandir In Mumbaion Knees Viral Video 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.