एकावेळी दोन एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:01 IST2016-10-14T09:53:04+5:302016-10-15T17:01:34+5:30
निर्माते राजन शाही यांच्या सपना बाबुल का बिदाई या मालिकेत पारुल चौहानने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर अमृत मंथन या ...

एकावेळी दोन एंट्री
न र्माते राजन शाही यांच्या सपना बाबुल का बिदाई या मालिकेत पारुल चौहानने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर अमृत मंथन या त्यांच्या मालिकेत ती एका छोट्याशा भूमिकेत झळकली आणि आता ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत ती काम करणार आहे. या मालिकेत कार्तिक म्हणजेच मोहसिन खानच्या आईच्या भूमिकेत तिची लवकरच एंट्री होणार आहे. तिने आतापर्यंत साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा ही खूपच वेगळी भूमिका आहे. पारुल पैशांचा हव्यास असलेल्या स्त्रीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता संदीप राजोराचीदेखील एंट्री होणार आहे. संदीप या मालिकेत तिच्या पतीची भूमिका साकारणार आहे. संदीपने कहानी घर घर की, क्योंकी साँस भी कभी बहू थी, कुसूम, महाभारत, सुर्यपूत्र कर्ण यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
![]()