जया बच्चनमुळे बिग बींनी गमावला असता KBC; अभिनेत्रीने धरला होता नको तो हट्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 15:01 IST2023-04-07T15:00:17+5:302023-04-07T15:01:17+5:30
Jaya bachchan: केबीसीच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.

जया बच्चनमुळे बिग बींनी गमावला असता KBC; अभिनेत्रीने धरला होता नको तो हट्ट
अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) . केबीसी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या शोचं गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सूत्रसंचालन करत आहे. त्यामुळे हा शो आणि बिग बी हे जणू एक समीकरणचं झालं आहे. बिग बींमुळे अनेक जण हा शो आवर्जुन पाहतात. मात्र, अभिनेत्री जया बच्चन यांनी बिग बींना हा शो करु नये असा सल्ला दिला होता.एका मुलाखतीमध्ये जया बच्चन यांनी हा खुलासा केला आहे.
केबीसीच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यामुळे त्यांना छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक होते. या शोचा पहिला भाग ३ जुलै २००० साली प्रदर्शित झाला होता. मात्र, बिग बींनी हा शो करावा असं जया बच्चन यांच्या अजिबात मनात नव्हतं.
47 वर्षानंतर रेखा-अमिताभ बच्चन यांचे Unseen photos आले समोर;चाहते झाले थक्क
"अमिताभ यांनी केबीसी करु नये असं मला सतत वाटत होतं. कारण, त्यांनी मोठ्या पडद्यावर कमावलेलं नाव, त्यांची प्रतिमा याला हा शो शोभणारा नाही असं मला वाटत होतं. पण, प्रत्यक्षात उलटं झालं. हा शो अपेक्षेपेक्षा कैकपटीने जास्त गाजला", असं जया बच्चन म्हणाल्या. दरम्यान, केबीसीचे आतापर्यंत १४ पर्व पार पडले आहेत. या शोमध्ये आतापर्यंत अनेकांना भाग घेतला असून कित्येकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.