टीव्ही संक्रमाणाच्या प्रक्रियेतून जातोय - आमिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 19:36 IST2016-04-13T02:34:24+5:302016-04-12T19:36:52+5:30
मोठा पडदा - छोटा पडदा असा टीव्ही आणि सिनेमात फरक केला जातो. पण आता तो केवळ नावापुरता राहिलेला आहे. ...

टीव्ही संक्रमाणाच्या प्रक्रियेतून जातोय - आमिर
म ठा पडदा - छोटा पडदा असा टीव्ही आणि सिनेमात फरक केला जातो. पण आता तो केवळ नावापुरता राहिलेला आहे. आजचे टीव्ही कलाकार चित्रपट हीरो-हीरोईन एवढेच प्रसिद्ध आहेत. त्यांचासुद्धा ‘लॉयल फॅन’ बेस आहे, जे आवडीने आपल्या आवडत्या कलकारांचे टीव्ही शो पाहतात. अशाच प्रसिद्ध कलाकारांपैकी एक नाव म्हणजे आमिर अली.
झी टीव्हीची मालिका ‘सरोजिनी’मध्ये आमिर मुख्य भूमिका साकारत आहे. त्याची भूमिका आणि एकंदर टेलिव्हिजन इंडस्ट्रीविषयी जाणून घेण्यासाठी ‘सीएनएक्स’ने त्याच्याशी मनमोकळा संवाद साधला.
* तुझ्या नव्या भूमिकेविषयी चाहत्यांच्या कशा प्रतिक्रिया आहेत?
सोशल मीडियावर मला चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माझ्या नवीन भूमिकेविषयी ते प्रचंड उत्सुक आहेत. चाहत्यांच्या अशा प्रेमामुळे काम करताना नवीन ऊर्जा मिळते. पण जे चाहते सोशल मीडियावर सक्रीय नाहीत, विशेषकरून गृृहिणी, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला मला खूप आवडेल.
* ‘सरोजिनी’मध्ये तुझी भूमिका कशी आहे?
मी ‘ऋषभ’ नावाच्या एका व्यावसायिकाच्या भूमिकेत आहे. तो मुळ लखनऊचा आहे. स्वत:च्या हिंमतीवर यशस्वी झालेला ‘ऋषभ’ अत्यंत हुशार आणि मनमिळावू स्वभावाचा आहे. परंतु त्याचे एक गुपित असून ते काही काळानंतर बाहेर पडणार. त्यामुळे मी एकदम एक्सायटेड आहे.
* ‘मोहित-शाईनी’ची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्याच्या जागी शाईनीसोबतची तुझी जोडी प्रेक्षकांना आवडेल?
माझ्यासाठी हा एकदम नवीन शो आहे. माझ्या आधी शोमध्ये काय होते आणि आता काय होईल याकडे मी जास्त लक्ष देत नाही. मी केवळ प्रामाणिकपणे माझे काम करू शकतो. माझ्या येण्यामुळे शोला फायदा झाला तर चांगलेच आहे. प्रेक्षकांना माझी भूमिका आवडेल, अशी अपेक्षा करतो.
![Aamir Ali]()
* सध्या टीव्ही सिरियल्समध्ये ‘सुपरनॅचरल’ गोष्टी पाहायला मिळत आहेत. यावर तुझे मत?
लोकांना जे पाहायला आवडते, तेच टीव्हीवर दाखविण्यात येते. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रयोग म्हणून अशा गोष्टींचा वापर केला जातो आणि जेव्हा एखाद्या फॉर्म्युला हीट ठरतो तेव्हा इतर शो आणि चॅनल तोच फॉर्म्युला वापरून प्रेक्षकवर्ग टिकवण्याचा प्रयत्न करतात.
* एवढ्या वर्षांपासून तु या क्षेत्रात काम करतोय. आजच्या काळात तुला काही बदल जाणवतात?
हो नक्कीच जाणवतात. टीव्हीवर सध्या नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहेत. तांत्रिक बाबींबरोबरच वेगळ्या धाटणीच्या कथा समोर येत आहेत. सध्या टीव्ही संक्रमणाच्या प्रक्रियेतून जात आहे. मुळात कथा कोणतीही असू द्या, सादरीकरण उत्तम करणे गरजेचे असते.
विनोदी, रोमँटिक कॉमेडी किंवा ड्रामा यांपैकी कोणत्या भूमिका तुला आवडतात?
खरं सांगू? एक चांगल्या अभिनेत्याने सर्व प्रकारच्या भूमिका स्वीकारल्या पाहिजे. केवळ एकच साच्यात मला स्वत:ला अडकवून ठेवायचे नाही. माझ्या सर्व भूमिका चाहत्यांनी उचलून धरल्या, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.
![aAMIR sANJEEDA]()
पॉवर कपल : संजिदा शेख - आमिर अली
* काम आणि संसार यांचा मेळ तु कसा बसवतो?
माझी पत्नी संजिदा याच क्षेत्रात काम करत असल्यामुळे आम्ही एकमेकांची व्यस्तता समजून घेतो. शुटिंगमुळे एकमेकांना फारसा वेळ देता येत नाही, पण काय करणार? कामाचा तो एक भाग आहे. पण संजिदा मला नेहमीच याबाबतीत साथ देते.
* आगामी बॉलिवूड प्रोजेक्ट?
मालिकेच्या अतिव्यस्त वेळापत्रकातून चित्रपटांना वेळ देणे शक्य नाही. मी नशीबवान आहे की, चित्रपटांतून मला चांगले रोल करायला मिळाले. परंतु सध्या मी जे करत आहे, त्यामध्ये मी खूप खूश आहे.