आई झाली ‘देवों के देव महादेव’मधील अभिनेत्री पूजा बॅनर्जी, गोंडस बाळाला दिला जन्म

By गीतांजली | Updated: October 9, 2020 18:01 IST2020-10-09T18:00:04+5:302020-10-09T18:01:53+5:30

टीव्ही अभिनेत्री पूजा बनर्जी आई झाली आहे.

Tv actress puja banerjee blessed with baby boy | आई झाली ‘देवों के देव महादेव’मधील अभिनेत्री पूजा बॅनर्जी, गोंडस बाळाला दिला जन्म

आई झाली ‘देवों के देव महादेव’मधील अभिनेत्री पूजा बॅनर्जी, गोंडस बाळाला दिला जन्म

टीव्ही अभिनेत्री पूजा बनर्जी आई झाली आहे. आज (9 ऑक्टोबरला ) पूजाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना, पूजाचा पती कुणालने ही माहिती दिली आहे. कुणाल म्हणाला, 'पूजा आणि मी आज खूप आनंदी आहोत.  आम्हाला हे सांगताना आनंद होतोय की पूजाने मुलाला जन्म दिला आहे. आई आणि मुलगा दोघे सुखरुप आहेत.'

 

पूजा बॅनर्जीने लॉकडाऊनमध्ये तिचा प्रियकर आणि अभिनेता कुणाल वर्माशी लग्न केले. कुणाल आणि पूजाने कोर्ट मॅरेज केले आहे. रिपोर्टनुसार पूजा म्हणाली, आपल्या मुलाच्या जन्मानंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याची इच्छा तिची आहे. पूजाने बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा जवळपास १० वर्षे रिलेशनशीपमध्ये होते.

पूजा आणि कुणाल यांची पहिली भेट 'तुझ संग प्रीत लगाई सजना'च्या सेटवर झाली होती. हळूहळू यांच्यात जवळीक निर्माण झाली. पूजाने छोट्या पडद्यावर तुझे संग प्रीत बड़ा बड़ा सजना, द कपिल शर्मा शो आणि देवों के देव महादेव अशा अनेक प्रसिद्ध कार्यक्रम केले आहे. या मालिकेव्यतिरिक्त सर्वगुण संपन्न, कबूल है, कॉमेडी नाइट्स बचाओ, झलक दिखला जा 8, कॉमेडी क्लासेस या शोजमध्येही तिने काम केले आहे.पार्वतीच्या भूमिकेमुळे पूजा खूप प्रसिद्ध झाली आहे.

पूजा बॅनर्जीच्या बेबी शॉवरचे फोटो तुम्ही पाहिलेत?

 

Web Title: Tv actress puja banerjee blessed with baby boy