१७व्या वर्षी घेतली BMW गाडी; आता २१व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वप्नातलं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 11:11 AM2024-02-11T11:11:18+5:302024-02-11T11:12:23+5:30

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने २१व्या वर्षी मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, म्हणाली...

tv actress anushka sen buys home in mumbai at age of 21 shared photo | १७व्या वर्षी घेतली BMW गाडी; आता २१व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वप्नातलं घर

१७व्या वर्षी घेतली BMW गाडी; आता २१व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वप्नातलं घर

अनुष्का सेन हा टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करून तिने अगदी कमी वेळात स्वत:चं स्थान निर्माण केलं. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. बालवीर या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अनुष्काने तिच्या चाहत्यांबरोबर एक खुशखबर शेअर केली आहे. अनुष्काने नुकतंच मुंबईत तिच्या स्वप्नातलं घर खरेदी केलं आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या अनुष्काने अवघ्या २१व्या वर्षी मायानगरी मुंबईत स्वत:चं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. अनुष्काने आईवडिलांबरोबरचे नव्या घरातील फोटो शेअर केले आहेत. "आमचं नवीन घर...सेन फॅमिली...आणखी एक स्वप्न पूर्ण झालं", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी अनुष्काचं अभिनंदन केलं आहे. अनुष्काने याआधी अवघ्या १७व्या वर्षी BMW गाडी खरेदी केली होती. त्यानंतर आता ती घराची मालकीण झाली आहे. 

अनुष्काने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. २००९ साली यहा मै घर घर खेली मालिकेतून तिने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'बालवीर', 'देवों के देव महादेव', 'झांसी की रानी' अशी अनेक मालिकांमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. आता कोरियन सिनेसृष्टीत ती पदार्पण करणार आहे. 

Web Title: tv actress anushka sen buys home in mumbai at age of 21 shared photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.