टीव्ही अभिनेता परम सिंहला 'मिशन इम्पॉसिबल 2' सिनेमातील टॉम क्रुझमुळे मिळाली अभिनेत्या बनण्याची प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 13:17 IST2017-01-21T07:46:51+5:302017-01-21T13:17:53+5:30

प्रत्येकाला कोणते क्षेत्रात आपल्याला आपले करिअर घडवायचे आहे. याविषयी कोणाकडून तरी प्रेरणा मिळत असते. प्रत्येकाचा कोणी ना कोणी आपल्या ...

TV Actor Param Singh's 'Mission Impossible 2' movie inspired by Tom Cruise to become an actor | टीव्ही अभिनेता परम सिंहला 'मिशन इम्पॉसिबल 2' सिनेमातील टॉम क्रुझमुळे मिळाली अभिनेत्या बनण्याची प्रेरणा

टीव्ही अभिनेता परम सिंहला 'मिशन इम्पॉसिबल 2' सिनेमातील टॉम क्रुझमुळे मिळाली अभिनेत्या बनण्याची प्रेरणा

रत्येकाला कोणते क्षेत्रात आपल्याला आपले करिअर घडवायचे आहे. याविषयी कोणाकडून तरी प्रेरणा मिळत असते. प्रत्येकाचा कोणी ना कोणी आपल्या आयुष्यात आदर्शव्यक्ति असतो त्यानुसारच आपण घडायचा प्रयत्नही करतो.टीव्ही अभिनेता परम सिंहला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी एक व्यक्ति ठरलीय प्रेरणादायी. मिशन “मिशन इम्पॉसिबल-2या सिनेमातल्या टॉम क्रेझमपासून प्रेरणा घेत 'गुलाम' या मालिकेत चॉकोलेट बॉय परम सिंह नेगेटीव्ह शेड असलेल्या अँटी-हिरोच्या भूमिकेत  झळकणार आहे. नेहमीच्या रोमँटीक इमेज असणा-या भूमिका करण्यापेक्षा आव्हानात्मक  भूमिका आपल्यातील अभिनेत्याला आपले अभिनयगुण व्यक्त करण्याची संधी देत असल्याचे  परम सिहंचे मत असून ‘मिशन इम्पॉसिबल’ सिनेमातील टॉम क्रूझच्या भूमिकेमुळे आपल्याला सिनेक्षेत्रात पदार्पण करण्याची प्रेरणा मिळाली, असे परमसिंह सांगतो.या मालिकेतील भूमिकेसंदर्भात त्याला विचारले असता परमसिंह म्हणाला,“टॉम क्रूझला मी ‘मिशन इम्पॉसिबल-2’ या सिनेमात बघितलं आणि माझं भानच हरपलं. हा सिनेमा बघितल्यावरच मी सिनेक्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.कॉलेजमध्ये असताना मी ब-याच नाटकांतून काम केली होती आणि नंतर मी अभिनयाचं  रितसर प्रशिक्षणही घेतलं.

मला वयाच्या 25 व्या वर्षी  'परवरिश -कुछ खट्टी, कुठ मिठी  ही 'माझी पहिली मालिका मिळाली आणि त्यानंतर मी मागे वळून बघितलंच नाही. रोज सकाळी मी 6.00 वाजता उठतो आणि त्या दिवशी माझा सर्वोत्तम अभिनय करण्याच्या इच्छेने प्रेरित होतो.”असे तो सांगतो.विशेष म्हणजे परम हा अर्थशास्त्र विषयात  पदवीधर असूनही अभियक्षेत्रालाच आपले करिअर म्हणून निवडेल. त्याला अभिनय करण्यातच पूर्ण समाधान मिळतं. सध्या तो ‘गुलाम’ या मालिकेत रंगीला ही व्यक्तिरेखा साकारत आहे. बेरहमपूर या काल्पनिक गावात तो एका गुलामाचं जीवन जगणारा रंगीला नावाती भूमिका साकरत आहे. 

Web Title: TV Actor Param Singh's 'Mission Impossible 2' movie inspired by Tom Cruise to become an actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.