देवासारखा धावून आला! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 11:02 AM2023-10-06T11:02:09+5:302023-10-06T11:07:08+5:30

सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.  असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेता एका व्यक्तीचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे.

tv actor gurmeet choudhary giving CPR to man to save his life video goes viral | देवासारखा धावून आला! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

देवासारखा धावून आला! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.  असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेता एका व्यक्तीचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून गुरमीत चौधरी आहे.  त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

'वुम्पला' या इन्स्टाग्राम पेजवरुन गुरमीतचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत गुरमीत एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी त्याला CPR देताना दिसत आहे. आजूबाजूला लोकांची गर्दी झाल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून गुरमीतवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 

"तुम्हाला सलाम...मुंबईमध्ये लोक अशाचप्रकारे एकमेकांची मदत करतात", असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "वाचवायला खुद्द श्रीराम आले आहेत," अशी कमेंट केली आहे. "सगळ्यांनी अशीच मदत केली तर भारत पुढे जाईल," असंही एकाने म्हटलं आहे. 

दरम्यान, गुरमीत 'रामायण' मालिकेत श्रीरामच्या भूमिकेत होता. या मालिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.  त्यानंतर अनेक मालिका आणि टीव्ही शोमध्ये गुरमीत झळकला. रामायणमध्ये माता सीतेची भूमिका साकारलेल्या देबिना बॅनर्जीबरोबर त्याने २०११मध्ये लग्न केलं. त्यांना दोन मुली आहेत. 

Web Title: tv actor gurmeet choudhary giving CPR to man to save his life video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.