अभिनेता अर्जुन बिजलानीची मोठी फसवणूक, OTP दिला नाही तरी गेले पैसै; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 15:01 IST2024-05-20T15:00:44+5:302024-05-20T15:01:50+5:30
प्रत्येक मिनिटाला जात होते पैसे... असा कोणता सायबर फ्रॉड?

अभिनेता अर्जुन बिजलानीची मोठी फसवणूक, OTP दिला नाही तरी गेले पैसै; नेमकं काय घडलं?
टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीची (Arjun Bijlani) मोठी फसवणूक झाली आहे. त्याला ४० हजार रुपयांचा फटका बसला आहे. अर्जुन जिममध्ये असताना त्याची ही फसवणूक झाली. ओटीपी न सांगताही त्याच्या अकाऊंटमधून ४० हजार रुपये गायब झाले. त्याच्यासोबत हा सायबर फ्रॉड नेमका झाला तरी कसा वाचा.
अर्जुन बिजलानी या फसवणूविषयी सांगताना म्हणाला, "माझं क्रेडिट कार्ड माझ्याजवळच होतं. मी तेव्हा जीममध्ये होतो. काही मिनिटांसाठी मी ब्रेक घेतला आणि मोबाईल बघतो तर क्रेडिड कार्डचे अनेक मेसेज आलेले दिसले. प्रत्येक मिनिटाला माझं क्रेडिट कार्ड स्वॅप होत होतं. माझ्या पत्नीकडेही सप्लीमेंटरी कार्ड आहे. मी तिला विचारलं तर ती म्हणाली की कार्ड तिच्याजवळच आहे. तेव्हा समजलं की कार्डचे डिटेल्स लीक झाले आहेत. पण कसं आणि कुठे हे कळत नव्हतं."
तो पुढे म्हणाला, "मी बँकेत फोन करुन लगेच कार्ड ब्लॉक केलं. पण तोपर्यंत सात वेळा ट्रान्झॅक्शन झालं होतं आणि ४० हजार खर्च झाले होते. माझ्या कार्डची लिमिट १० ते १२ लाख आहे. जर मी त्वरीत कार्ड ब्लॉक केलं नसतं तर परिस्थिती आणखी वाईट झाली असती. तसं पाहायला गेलं तर जेव्हा जेव्हा क्रेडिट कार्ड किंवा अन्य कोणत्या कार्डने व्यवहार होतात तेव्हा फोनवर ओटीपी येतो. पण या केसमध्ये ओटीपी न येताच पैसे गेले. आपण डिजीटल होत चाललो आहोत हे चांगलं आहे पण तितकंच धोकादायकही आहे. आता मी इतका घाबरलोय की दर महिन्याला कार्ड बदलणार आहे. सध्या बँक आणि सायबर सेल याप्रकरणाची चौकशी करत आहेत.