​स्टार प्रवाहवरील 'नकळत सारे घडले'च्या कथानकाला मिळणार हे वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 10:56 AM2018-04-20T10:56:33+5:302018-04-20T16:26:33+5:30

कोणाचेही कुठल्याही प्रकारे शोषण होणे अयोग्यच... अनेकदा जवळच्याच, ओळखीच्याच व्यक्तींकडून असे प्रकार घडतात. त्यावेळी काय करावे असा प्रश्न निर्माण ...

The turn of the story of 'All done unknowingly' on Star stream will be given | ​स्टार प्रवाहवरील 'नकळत सारे घडले'च्या कथानकाला मिळणार हे वळण

​स्टार प्रवाहवरील 'नकळत सारे घडले'च्या कथानकाला मिळणार हे वळण

googlenewsNext
णाचेही कुठल्याही प्रकारे शोषण होणे अयोग्यच... अनेकदा जवळच्याच, ओळखीच्याच व्यक्तींकडून असे प्रकार घडतात. त्यावेळी काय करावे असा प्रश्न निर्माण होतो. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शोषणाविरोधात न घाबरता, धैर्याने आवाज उठवलाच पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा दिलीच पाहिजे. स्टार प्रवाहच्या 'नकळत सारे घडले' या मालिकेतील नेहा आता शोषणाविरोधात खंबीरपणे आवाज उठवणार आहे. तिच्या प्रयत्नांना यश मिळतं का, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून 'नकळत सारे घडले' या मालिकेच्या कथानकाला वेगळेच वळण मिळाले आहे. स्वत: डॉक्टर असलेल्या नेहाचे तिच्या नणंदेच्या पतीकडून, संजयकडून शोषण होत आहे. मात्र, आता नेहाचा संयम संपला आहे. तिने धीराने उभे रहायचे ठरवले आहे. शोषणाविरोधात आवाज उठवण्याचा तिने निर्णय घेतला आहे.
शोषणाविरोधात उभे राहण्याविषयी नेहाची भूमिका साकारणारी नुपूर परूळेकर सांगते, "अन्याय निमूटपणे सहन करू नका. त्याच्याविरोधात आवाज उठवा, अपराध करणाऱ्यापेक्षा सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. नेहाने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात बंड पुकारलाय, तिच्या लढ्यात तुमचीही साथ असू द्या."
शोषणाविरोधात आवाज उठवण्याच्या नेहाच्या निर्णयाला स्टार प्रवाह परिवारातील बाकी नायिकांनीही पाठिंबा दिला आहे. "कुठल्याही अन्यायाला सडेतोड उत्तर दिलेच पाहिजे. स्त्री कोणत्याही संकटावर मात करू शकते. त्यामुळे अन्याय झाला तर तो सहन न करता हाणूनच पाडला पाहिजे. त्यासाठी मला एका कवितेच्या ओळी आठवतात त्या अशा, 'असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..' असे 'लेक माझी लाडकी' या मालिकेतली मीरा अर्थात सायली देवधर सांगते.
तर 'गोठ'ची नायिका राधा म्हणजे रुपल नंद सांगते, "एरवी इतरांसाठी जगणारी तू, आज एकदा स्वतःसाठी काहीतरी कर."
"स्त्री हा किती साधा शब्द आहे नाही?...जन्म तिनेच द्यायचा, यातनाही तिनेच सहन करायच्या, पुरुषाच्या सुखात तिने सहभागी व्हायचे; पण तिच्या यातना कोण बरं सहन करू शकेल? दुसऱ्याच्या घरातील मुली किंवा स्त्रिया यांना उपभोग्य वस्तू समजणाऱ्या नराधमांना समज देण्याची वेळ आता आली आहे आणि हे काम आपण स्त्रियांनीच करायचे आहे. आपण खंबीर व्हायचे आहे," अशा शब्दांत 'शतदा प्रेम करावे'च्या सायलीने म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकरने नेहाला पाठिंबा दिला आहे.
'छोटी मालकीण' ऐतशा संझगिरीनं सांगितलं, "प्रत्येक स्त्रीला स्पर्श कुठल्या हेतूने केला आहे हे ओळखता येतं. जेव्हा पहिल्यांदा त्या स्पर्शाबाबत काहीतरी विचित्र जाणवते, तेव्हाच स्त्रीनं प्रतिकार करायला हवा."
आपल्याबरोबर होणाऱ्या शोषणाविरोधात नेहा कशा पद्धतीनं उभी राहते हे प्रेक्षकांना नकळत सारे घडलेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. 

Also Read : 'नकळत सारे घडले'च्या सेटवर झाली आईस्क्रीम पार्टी

Web Title: The turn of the story of 'All done unknowingly' on Star stream will be given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.