Tunisha Sharma Suicide Case: अजून एक सुशांत? तुनिशा शर्माच्या आत्महत्येवर SSRच्या बहिणीने व्यक्त केला संशय...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 07:12 PM2022-12-25T19:12:39+5:302022-12-25T19:13:32+5:30

Tunisha Sharma Suicide Case: सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता सिंग तुनिशा शर्माच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित केला आहे.

Tunisha Sharma Suicide Case: Sushant Singh Rajput's sister expresses suspicion on Tunisha Sharma's suicide | Tunisha Sharma Suicide Case: अजून एक सुशांत? तुनिशा शर्माच्या आत्महत्येवर SSRच्या बहिणीने व्यक्त केला संशय...

Tunisha Sharma Suicide Case: अजून एक सुशांत? तुनिशा शर्माच्या आत्महत्येवर SSRच्या बहिणीने व्यक्त केला संशय...

googlenewsNext

Tunisha Sharma Suicide Case: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिच्या मृत्युमुळे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. तुनिशा हिने तिच्या शोच्या सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली, त्यामुळे खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्याच केली की तिचा घातपात झाला, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंगने तुनिशाच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे.

तुनिशा शर्माच्या आत्महत्येवर सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग किर्तीने प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये तिने तुनीशाच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित केला आहे. श्वेता सिंहने तिच्या ट्विटमध्ये लिहिले- 'मला वाटत नाही की, ही आत्महत्या आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये आत्महत्या कोण करते? अजून एक सुशांत सिंग राजपूत? काय होतंय कळत नाही. ती फक्त 20 वर्षांची होती.' असे ट्विट श्वेता सिंगने केले. 

शिझान खान पोलिसांच्या ताब्यात
तुनिशा आत्महत्या प्रकरणात एकापाठोपाठ एक नवीन खुलासे होत आहेत. तुनिशाच्या आत्महत्येचे कारण तिचा खास मित्र शिझान खान असल्याचे सांगितले जात आहे. तुनिशाच्या आईनेही शिझानवर आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला आहे. तुनिशाच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिझानवर कडक कारवाई केली आहे. शिझानला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिझानची 28 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत चौकशी केली जाणार आहे.
 

Web Title: Tunisha Sharma Suicide Case: Sushant Singh Rajput's sister expresses suspicion on Tunisha Sharma's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.