या कारणामुळे पाठकबाईंना सोडावी लागणार शाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 16:59 IST2019-01-07T16:51:35+5:302019-01-07T16:59:54+5:30
सध्या मालिकेत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आबासाहेबांनी सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी अंजलीचं नाव पुढे केलं तसंच घरातील सगळ्यांचा आणि गावकऱ्यांचा पाठिंबा हा अंजलीलाच मिळतोय.

या कारणामुळे पाठकबाईंना सोडावी लागणार शाळा
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत आणि त्या तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.
सध्या मालिकेत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आबासाहेबांनी सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी अंजलीचं नाव पुढे केलं तसंच घरातील सगळ्यांचा आणि गावकऱ्यांचा पाठिंबा हा अंजलीलाच मिळतोय हे पाहून नंदिता खवळते आणि अपक्ष राहून निवडणुकीला उभं राहायचा निर्णय घेते. त्यात ती राणाकडून फक्त तिलाच पाठिंबा द्यायचं वचन देखील घेते.
अंजलीला निवडणुकीतून बाद करण्यासाठी नंदिता अंजली आणि राणाचं मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा गहाळ करते. पण अंजली त्या अडचणीवर मात करून राणाशी पुन्हा लग्न करून नवीन मॅरेज सर्टिफिकेट मिळवते.
अंजलीचा फॉर्म बाद करण्याचा नंदिताचा प्रयत्न फसतो त्यामुळे संतापलेल्या तिच्या डोक्यात अजून काहीतरी प्लॅन्स शिजत आहेत. नंदिता अंजलीची आवडती गोष्ट तिच्यापासून हिरावून घेणार आहे. निवडणूक लढवताना उमेदवार कुठल्याही प्रकारची नोकरी करू शकत नाही आणि हीच गोष्ट नंदिता सगळ्यांच्या लक्षात आणून देणार आहे. आता नंदिताच्या नवीन चालीमुळे अंजलीला शाळा सोडावी लागणार आहे. अंजली आणि नंदिता मधील हि लढत दिवसेंदिवस अजूनच रंजक बनत चालली आहे. आता सरपंच कोण बनणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.