तुझ्यात जीव रंगलामधील माधुरी खऱ्या आयुष्यात दिसते ग्लॅमरस, पाहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 17:23 IST2020-01-01T17:16:00+5:302020-01-01T17:23:03+5:30

खऱ्या आयुष्यात माधुरीची भूमिका साकारणारी संध्या अतिशय ग्लॅमसर असून तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिचे ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात.

Tujhyat Jeev Rangala madhuri Aka sandhya manik real life pictures | तुझ्यात जीव रंगलामधील माधुरी खऱ्या आयुष्यात दिसते ग्लॅमरस, पाहा तिचे हे फोटो

तुझ्यात जीव रंगलामधील माधुरी खऱ्या आयुष्यात दिसते ग्लॅमरस, पाहा तिचे हे फोटो

ठळक मुद्देमाधुरीची भूमिका नकारात्मक असली तरी तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे प्रचंड आवडते असून त्यांच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्यांना आवडते. आज आम्ही तुम्हाला याच मालिकेतील एका कलाकाराविषयी एक खास गोष्ट सांगणार आहोत. या मालिकेतील माधुरी सध्या प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे.

माधुरीची भूमिका नकारात्मक असली तरी तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. ही भूमिका अभिनेत्री संध्या माणिक साकारत असून तिच्याविषयी आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत. या मालिकेत माधुरीची वेशभुषा एखाद्या ग्रामीण भागात राहाणाऱ्या मुलीसारखी असल्याने आपल्याला तिला भारतीय पेहरावात पाहायला मिळते. पण खऱ्या आयुष्यात संध्या अतिशय ग्लॅमसर असून तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिचे अनेक ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात.

संध्या ही मुळची पुण्याची असली तरी तिने शिक्षण मुंबईतून घेतले आहे. ती आज अभिनयक्षेत्रात असली तरी तिने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. संध्याने तुझ्यात जीव रंगला या मालिकेप्रमाणेच मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. अहिल्या या चित्रपटात ती प्रिया बेर्डे यांच्यासोबत झळकली होती. तसेच गुरू या चित्रपटात देखील तिने काम केले होते. 

Web Title: Tujhyat Jeev Rangala madhuri Aka sandhya manik real life pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.