'तू तेव्हा तशी' मालिकेतील माई मावशी जोमात, बाकी सगळे कोमात..., एकदा पाहा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 14:17 IST2022-05-20T14:16:04+5:302022-05-20T14:17:06+5:30
Tu Tevha Tashi: तू तेव्हा तशी मालिकेतील माई मावशी आणि वल्ली ऑन स्क्रीन जरी भांडत असल्या तरी ऑफस्क्रीन त्यांची धमाल चालू असते.

'तू तेव्हा तशी' मालिकेतील माई मावशी जोमात, बाकी सगळे कोमात..., एकदा पाहा हा व्हिडीओ
झी मराठी वाहिनीवरील अभिनेता स्वप्नील जोशी (Swapanil Joshi) आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) यांची मालिका तू तेव्हा तशी(Tu Tevha Tashi)ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. स्वप्नील जोशीने सौरभची तर शिल्पा तुळसकरने अनामिकाची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची जोडी आणि त्यांचे फुलणारे प्रेम प्रेक्षकांना आवडत आहे. पण त्याच सोबत या मालिकेत एक जोडी अशी आहे ज्यांची नोकझोक सतत चालू असते ते म्हणजे माई मावशी आणि वल्ली.
ऑन स्क्रीन जरी या दोघी भांडत असल्या तरी ऑफस्क्रीन त्यांची धमाल चालू असते आणि त्यांचा पुरावा म्हणजे अभिज्ञा भावे हिने सोशल मीडियावर शेअर केलेले मजेशीर व्हिडीओ. अभिज्ञा सेटवरील मजा-मस्ती व्हिडिओजच्या रूपात आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच सोशल मीडियावर माई मावशी आणि वल्ली यांचा एक मजेदार व्हिडिओ प्रेक्षकांनी पाहिला आणि हसून हसून लोटपोट झाले.
या व्हिडिओमध्ये अभिज्ञा माई मावशींना म्हणते की "अहो मावशी आपल्या समोरच्या चाळीचे मालक कोमात गेले." त्यावर मावशी मिश्कीलपणे म्हणतात, "श्रीमंत माणसं, मनाला वाटेल तिकडे जातात हो." वल्ली आणि मावशी या स्क्रीनवर जरी एकमेकांशी वाद घालत असल्या तरी ऑफस्क्रीन त्यांचं बॉण्डिंग खूपच चांगले आहे आहे हे त्यांच्या ऑफस्क्रीन चाललेल्या धमालमस्ती वरून कळून येते.