Trending: सोशल मीडियावर कलाकारांची धूम, तमिळ गाण्यावर ठेका धरत स्वीकारलं नवं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 11:31 AM2021-03-13T11:31:48+5:302021-03-13T11:33:30+5:30

नुकतंच या कलाकारांनी एका सुपरहिट तमिळ सिनेमातल्या सुपरहिट गाण्यावर ठेका धरला.चाहत्यांसाठी कोणाची डान्सिंग स्कील सर्वात चांगली हे ठरवणेही कठीणच.

Trending: Start pravah actors accept challenge of dancing on the viral tamil song | Trending: सोशल मीडियावर कलाकारांची धूम, तमिळ गाण्यावर ठेका धरत स्वीकारलं नवं चॅलेंज

Trending: सोशल मीडियावर कलाकारांची धूम, तमिळ गाण्यावर ठेका धरत स्वीकारलं नवं चॅलेंज

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील मालिकांमधील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेच्या माध्यमातून रसिकांच्या मनोरंजनाची जबाबदारी पार पाडत असतानाच पडद्यामागे देखिल कलाकारांची धमाल अविरतपणे सुरु असते. सोशल मीडियावरचं कोणतंही चॅलेंज असलं तरी ही कलाकारमंडळी मागे नसतात. नुकतंच या कलाकारांनी एका सुपरहिट तमिळ सिनेमातल्या सुपरहिट गाण्यावर ठेका धरला.

यामध्ये ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेता आणि कार्तिक म्हणजेच अनघा अतुल आणि आशुतोष गोखले यांनी सहभाग घेतला. पडद्यावर या दोघांचं फार पटत नसलं तरी पडद्यामागची या दोघांची केमिस्ट्री खरोखर वाखाणण्याजोगी होती. दोघेही फुल ऑन गाण्यावर बेधुंद होऊन थिरकत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघेही एकमेकांना कडवी टक्कर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी कोणाची डान्सिंग स्कील सर्वात चांगली हे ठरवणेही कठीणच. डान्स करताना आशुतोष आणि अनधा यां दोघांची ऊर्जा पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.

 ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ढवळे मामी म्हणजेच किशोरी अंबिये सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. त्यांनी देखिल सरु, अंजी आणि अवनीसोबत या हटके गाण्यावर आपल्या हटके अंदाजात ठेका धरला. सहकुटुंब सहपरिवार मालिकेची ही लेडी गँग सध्या या गाण्याच्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. 

View this post on Instagram

A post shared by Girija Girish prabhu (@girijaprabhu_official)

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या टीमच्या उत्साहालाही तोड नाही. या मालिकेतील गौरी म्हणजेच गिरीजा प्रभूने आपल्या सहकलाकारांसोबत ठेका धरला. गिरीजा उत्त्तम नृत्यांगना आहे त्यामुळे या नव्या चॅलेंजमध्ये सहभागी होत तिने धमाल केली. 

गौरी प्रमाणेच 'मुलगी झाली हो' मालिकेतील माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर देखिल यात मागे नव्हती. व्हिडिओमधील तिचा सोज्वळ अंदाज भाव खाऊन गेला. या सर्व व्हिडिओंना स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर लाखांमध्ये व्हूज आहेत. इतर माध्यमांवर देखिल हे व्हिडिओज भरभरुन व्हायरल होताना दिसत आहेत. मालिकांप्रमाणेच कलाकारांची पडद्यामागची धमाल प्रेक्षकांना आवडत आहे.

 

 

Web Title: Trending: Start pravah actors accept challenge of dancing on the viral tamil song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.