​व्हिजे बानीने केले होते टॉपलेस शूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 17:27 IST2016-10-26T17:27:21+5:302016-10-26T17:27:21+5:30

व्हिजे बानी सध्या बिग बॉसमध्ये झळकत आहे. बिग बॉसमध्ये प्रेक्षकांना ती खूपच आवडत आहे. बानी खरे तर एमटिव्ही रोडीज ...

The topless shoot that was made by Veena Bani | ​व्हिजे बानीने केले होते टॉपलेस शूट

​व्हिजे बानीने केले होते टॉपलेस शूट

हिजे बानी सध्या बिग बॉसमध्ये झळकत आहे. बिग बॉसमध्ये प्रेक्षकांना ती खूपच आवडत आहे. बानी खरे तर एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आली. या कार्यक्रमाचे उपविजेतेपददेखील तिने मिळवले आहे. यानंतर तिने फिअर फॅक्टर, आय कॅन डू दॅट यांसारख्या कार्यक्रमातही भाग घेतला. तिने आपका सुरूर या चित्रपटातही काम केले आहे. तसेच तिने दाक्षिणात्य आणि पंजाबी चित्रपटातही आपले भाग्य आजमावले आहे. बानी तिच्या टॅटूजमुळेही सध्या खूप चर्चेत आहे. कारण तिच्या दोन्ही हातांवर खूप सारे टॅटूज आहेत. पण त्याचसोबत बानी चर्चेत असण्याचे आणखी एक कारण आहे.
बानीने काही महिन्यांपूर्वी टॉपलेस फोटोशूट केले होते. पण त्यावेळी बानी इतकी प्रसिद्ध नसल्याने या फोटोशूटची तितकी चर्चा झाली नव्हती. पण आता ती बिग बॉसचा भाग असल्याने तिच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचा हा टॉपलेस फोटो अनेक सोशल नेटवर्किंग साईटवर फिरत आहे. या फोटोमध्ये बानीने स्कर्ट घातला आहे तर शरीराच्या वरच्या बाजूला कपडे न घालता केवळ काही दागिने घातले आहेत आणि तिच्या केसांनी तिची छाती लपवलेली आहे. हे फोटो सोशल नेटवर्किंगवर पाहून अनेकांना धक्काच बसत आहे. बानीची फिगर खूपच चांगली आहे. ती यासाठी जिममध्ये कित्येक तास घाम गाळते. त्यामुळे आपली फिगर दाखवण्यासाठी तिने अशी पोझ दिली असेल असे अनेकांना वाटत आहे. तसेच एका पायावर उभे राहून तिने स्वतःला बॅलन्सदेखील केले असल्याचे आपल्याला या फोटोत पाहायला मिळत आहे. 

Web Title: The topless shoot that was made by Veena Bani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.