Exclusive 'दिया और बाती' मालिकेचं सिक्वेलचं शीर्षक वेगळं असावं - अनस रशिद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 15:05 IST2016-09-08T09:35:15+5:302016-09-08T15:05:15+5:30
'दिया और बाती' या मालिकेचा लवकरच सिक्वेल येणार आहे. ही आनंदाची बातमी असली तरी या सिक्वेलचं शीर्षक वेगळं असावं ...

Exclusive 'दिया और बाती' मालिकेचं सिक्वेलचं शीर्षक वेगळं असावं - अनस रशिद
' ;दिया और बाती' या मालिकेचा लवकरच सिक्वेल येणार आहे. ही आनंदाची बातमी असली तरी या सिक्वेलचं शीर्षक वेगळं असावं तरच दिया और बाती या मालिकेची लोकप्रियता आणि महत्त्व टिकून राहिल असं मत सूरज अर्थात अनस रशिदनं व्यक्त केलंय. दिया और बाती या मालिकेनं पाच वर्ष रसिकांचं मनोरंजन केलंय. रसिकांनीही या मालिकेवर आणि मालिकेतल्या कलाकारांना भरभरुन प्रेम दिलंय. ही मालिका आता रसिकांचा निरोप घेत असताना हे वास्तव स्वीकारणं मालिकेतल्या कलाकारांसाठी अवघड जातंय. इतक्या वर्षात मालिकेच्या सगळ्या कलाकारांचं एकमेकांशी वेगळं नातं आपुलकीचं नातं निर्माण झालं होतं. मात्र मालिका एक्झिट घेत असल्यानं सगळे दुरावणार असून याचं प्रत्येकालाच दुःख आहे असं अनसला वाटतंय. मात्र जेव्हा एखाद्या चांगल्या गोष्टीचा शेवट होतो तिथूनच दुस-या गोष्टीची सुरुवात होत असते आणि यातूनच नवीन काही तरी करायला मिळेल याचा आनंद वाटत असल्याचं अनसनं खास सीएनएक्स लोकमतला सांगितलंय.