'रंग माझा वेगळा' मालिकेत या कलाकारानं केलं कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 20:38 IST2022-06-21T20:37:36+5:302022-06-21T20:38:07+5:30
'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) या मालिकेत अभिनेत्री वैशाली राहुल भोसलेनंतर आता आणखी एका कलाकाराने कमबॅक केले आहे.

'रंग माझा वेगळा' मालिकेत या कलाकारानं केलं कमबॅक
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. दरम्यान या मालिकेत अभिनेत्री वैशाली राहुल भोसलेनंतर आता आणखी एका कलाकाराने कमबॅक केले आहे. ही अभिनेत्री म्हणजे रंग माझा वेगळा मालिकेतील दीपाची मैत्रीण साक्षी. साक्षीची भूमिका अभिनेत्री मानसी घाटे (Manasi Ghate) हिने साकारली आहे.
रंग माझा वेगळा मालिकेत साक्षीची भूमिका अभिनेत्री मानसी घाटे हिने साकारली आहे. बरेच दिवस मानसी मालिकेत पाहायला मिळाली नाही. खरेतर मानसी घाटे हिची तब्येत खूप बिघडल्यामुळे तिने मालिकेतून मोठा ब्रेक घेतला होता. इतकेच नाही तर तिला डॉक्टरांनी सक्त आराम करण्याची ताकीद दिली होती. मात्र आता तिने मालिकेत कमबॅक केले आहे. नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात ती पाहायला मिळाली.
रंग माझा वेगळा मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. आयशाने जीव देण्याचे खोटे नाटक करून दीपाला फसवून कार्तिकला तिच्याशी लग्न करण्यासाठी सांगावे म्हणून तयार केले आहे. आयशाच्या डावात दीपा चांगलीच फसली आहे. यासाठी ती कार्तिकला ही खूप समजवते. इतकेच नाही तर ती तिच्या गळ्यातील मंगळसूत्र कार्तिकला काढून देते आणि आयशासोबत लग्न करण्यासाठी सांगते. आता कार्तिक काय निर्णय घेतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.