'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीची 'शुभविवाह' मालिकेत एन्ट्री, दिसणार ग्लॅमरस भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 07:15 PM2024-05-07T19:15:06+5:302024-05-07T19:15:06+5:30

'शुभविवाह' मालिकेत एक नवं पात्र दिसणार आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीची 'शुभविवाह' मालिकेत एन्ट्री झाली आहे. 

Thipkaya Rangoli fame actress sai kalyankar entry in Shubhavivah serial to play important role | 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीची 'शुभविवाह' मालिकेत एन्ट्री, दिसणार ग्लॅमरस भूमिकेत

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीची 'शुभविवाह' मालिकेत एन्ट्री, दिसणार ग्लॅमरस भूमिकेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'शुभविवाह' ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील भूमी-आकाशची जोडी प्रेक्षकांना भावते. अल्पावधीतच या मालिकेने आणि त्यातील पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आहे. आता या मालिकेत एक नवं पात्र दिसणार आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीची 'शुभविवाह' मालिकेत एन्ट्री झाली आहे. 

'शुभविवाह' मालिकेत भूमी आणि आकाशमध्ये घट्ट मैत्री होताना दिसत आहे. आकाशबद्दलच्या प्रेमाची जाणीव होत असतानाच आत्या नवीन डाव खेळत त्याची बालमैत्रीण वेदांगीला बोलवून घेत असल्याचं पाहायला मिळणार आहे. 'शुभविवाह' मालिकेत वेदांगीच्या ग्लॅमरस भूमिकेत ठिपक्यांची रांगोळी फेम अभिनेत्री सई कल्याणकर दिसणार आहे. याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'शुभविवाह' मालिकेत अभिनेता यशोमन आपटे आणि मधुरा देशपांडे यांच्याबरोबर आता सईदेखील झळकणार आहे. 

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून सई घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने मानसी ही भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा सई 'शुभविवाह' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. याआधी सईने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम करून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेतही ती झळकली होती. याशिवाय ‘तुझे नि माझे घर श्रीमंताचं’, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’, ‘बाप्पा मोरया’ आणि ‘भेटी लागी जिवा’, ‘फ्रेशर्स’ या मालिकांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली.  

Web Title: Thipkaya Rangoli fame actress sai kalyankar entry in Shubhavivah serial to play important role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.