'इस प्यार को क्या नाम दूँ' मालिकेचं रब्बा वे गाणं हिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 13:58 IST2017-05-25T08:28:10+5:302017-05-25T13:58:10+5:30

छोट्या पडद्यावरील 'इस प्यार को क्या नाम दूँ' ही मालिका सुपरहिट ठरली होती. मालिकेची कथा आणि यातील कलाकार यांना ...

They sing the song 'What is the name of this love?' | 'इस प्यार को क्या नाम दूँ' मालिकेचं रब्बा वे गाणं हिट

'इस प्यार को क्या नाम दूँ' मालिकेचं रब्बा वे गाणं हिट

ट्या पडद्यावरील 'इस प्यार को क्या नाम दूँ' ही मालिका सुपरहिट ठरली होती. मालिकेची कथा आणि यातील कलाकार यांना आजही रसिकांच्या मनात अढळ स्थान आहे. मालिकेतील अरनवसिंह रायजादा ही या मालिकेतील भूमिका विशेष गाजली होती. बिझनेसमन अरनवसिंह 'रायजादा' ही भूमिका अभिनेता बरुण सोबती याने साकारली होती. ही मालिका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेच्या कमबॅकची रसिकांमध्ये उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर मालिकेच्या फॅन्ससाठी एक नवं गाणं लॉन्च करण्यात आलंय. या मालिकेचं रब्बा वे हे नवं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या मालिकेत याआधीच एक गाणं होतं मग हे नवं गाणं का असा प्रश्न यानिमित्ताने रसिकांना पडला आहे. मात्र नव्या सीझनमध्ये मालिकेचं नवं वेगळ्या अंदाजात सादर करण्यात आले आहे. गाण्याची शब्दरचना आणि संगीत अफलातून आहे. हे गाणं ऐकल्यानंतर ते पुन्हा पुन्हा ऐकण्याची तुम्हाला इच्छा होईल. बरुण सोबती काही दिवसांपूर्वी एका वेबसिरीजमध्येही झळकला होता. बरुणच्या फॅन्ससाठी ही वेबसिरीज म्हणजे जणू काही एक ट्रीट होती. यांत बरुण आणि अभिनेत्री सुरभी ज्योती यांची जोडी रसिकांना भावली. बरुणनं विविध मालिका आणि सिनेमातही काम केलं आहे. मात्र त्याला खरी ओळख मिळवून दिली ती इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेनंच. अरनवसिंह रायजादा या बिझनेसमनच्या भूमिकेमुळे तो घराघरात लोकप्रिय ठरला होता. विशेष म्हणजे त्याच्यावर जीव ओवाळून टाकणा-या तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 

Web Title: They sing the song 'What is the name of this love?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.