"त्यांनी मला आधीच सांगितलंय...", लग्नाआधीच प्राजक्ता गायकवाड सासरच्या मंडळींबद्दल म्हणाली असं काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:11 IST2025-11-18T16:10:45+5:302025-11-18T16:11:13+5:30
Prajakta Gaikwad : प्राजक्ता गायकवाड लवकरच स्मार्ट सूनबाई सिनेमात झळकणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या ती मुलाखती देताना दिसत आहे. नुकतेच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या लग्नाबद्दल आणि सासरच्या मंडळींबद्दल सांगितलं.

"त्यांनी मला आधीच सांगितलंय...", लग्नाआधीच प्राजक्ता गायकवाड सासरच्या मंडळींबद्दल म्हणाली असं काही
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील 'येसूबाईं'च्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच शंभूराज खुडवडसोबत लग्नबेडीत अडकणार आहे. अलिकडेच तिचा साखरपुडा पार पडला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या ती तिचा आगामी सिनेमा स्मार्ट सूनबाई या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या ती मुलाखती देताना दिसत आहे. नुकतेच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या लग्नाबद्दल आणि सासरच्या मंडळींबद्दल सांगितलं.
प्राजक्ता तिच्या या नवीन आयुष्यात ती स्वतःला खूप भाग्यवान मानत आहे, कारण तिच्या अभिनय कारकिर्दीला तिच्या सासरच्या मंडळींनी मोठ्या मनाने स्वीकारले आहे. तिने या मुलाखतीत सांगितलं की, ''खरेतर हे सगळं माझ्यासोबत सुदैवाने घडत आहे. साखरपुड्याच्या आधी स्मार्ट सूनबाई या सिनेमाचं शूटिंग झालेलं आणि आता लग्न होणार असताना सिनेमा रिलीज होतोय. त्या सिनेमाचं शीर्षकही स्मार्ट सूनबाई असं आहे. त्यामुळे सगळं एकाच ठिकाणी येऊन थांबतंय.'' स्मार्ट सूनबाई सिनेमाबद्दल ती पुढे म्हणाली की, ''माझ्या दृष्टीने स्मार्ट सूनबाई म्हटलं तर समजूतदार असणारी. कुटुंबात सगळेच समजूतदार हवे. माणसाने माणसासोबत माणसासारखं वागले पाहिजे. या सिनेमातून आम्ही चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. ती पुढे म्हणाली की, माझ्यासाठी हे नातं नवीन आहे. माहेर आणि सासर या दोन्हीमध्ये समतोल कसा साधायचा हे शिकत आहे.''
''माझं सासरचं कुटुंब छान आहे आणि त्यांचा...''
सासरच्या मंडळीबद्दल प्राजक्ता म्हणाली की,'' माझं सासरचं कुटुंब छान आहे. त्यांचा मला पाठिंबा आहे. माझ्या करिअरलाही पाठिंबा आहे. त्यांच्या घरात मुलगी नाही आहे, त्यामुळे त्यांनी मला आधीच सांगितलं आहे की, तू आमच्याकडे सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून येत आहेस. त्यामुळे मी खूप खूश आहे. माझे कुटुंबही खूप आनंदी आहे आणि सासरची मंडळीही. आधी सिनेमा प्रदर्शित होणार आहे आणि त्यानंतर २ डिसेंबरला मी खऱ्या अर्थाने स्मार्ट सूनबाई होणार आहे.''