​हे आहेत झलक दिखलाजाचे तीन अंतिम स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 17:02 IST2016-10-26T17:02:47+5:302016-10-26T17:02:47+5:30

झलक दिखला जा या कार्यक्रमात सध्या ग्रेसी गोस्वामी, करिश्मा तन्ना, नोरा फतेही, सलमान युसुफ खान, शक्ती अरोरा, शंतनू महेश्वरी, ...

These are three of the last finalists of the show | ​हे आहेत झलक दिखलाजाचे तीन अंतिम स्पर्धक

​हे आहेत झलक दिखलाजाचे तीन अंतिम स्पर्धक

क दिखला जा या कार्यक्रमात सध्या ग्रेसी गोस्वामी, करिश्मा तन्ना, नोरा फतेही, सलमान युसुफ खान, शक्ती अरोरा, शंतनू महेश्वरी, सिद्धार्थ निगम, वैष्णवी पाटील, स्पंदन चतुर्वेदी, स्वस्ती नित्या आणि प्रिज्योत सिंग थिरकताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी टेरिया मगर या कार्यक्रमातून आऊट झाली होती. पण आता ती पुन्हा कार्यक्रमात येणार असून ती फायनलपर्यंत मजल मारणार असल्याचे कळतेय. 
झलक दिखला जा या कार्यक्रमाचे विजेतेपद कोणाला मिळेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. या कार्यक्रमातील शेवटच्या भागातील परफॉर्मन्सचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले असून अंतिम तीनमध्ये सलमान युसुफ खान, टेरिया मगर आणि शंतनू महेश्वरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे कळतेय. पण या तिघांमध्ये कोण जिंकले हे अद्याप तरी कळलेले नाही. बिग बॉसच्या घरात झलक दिखला जा या कार्यक्रमातील विजेत्याची घोषणा केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
झलक दिखला जाच्या शेवटच्या भागात हृतिक रोशन झळकणार असून तो स्पर्धकांसोबत थिरकणारदेखील आहे. तो काबिल या त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. शेवटच्या भागाचे चित्रीकरण आता करण्यात आले असले तरी या कार्यक्रमाचे प्रक्षेपण जानेवारीत होणार असल्याचे कळतेय. या कार्यक्रमातील पुढील सर्व भागांचे चित्रीकरण आधीच केले गेले असल्याचे कळतेय. झलक दिखला जा या कार्यक्रमाचे इतके दिवस आधी चित्रीकरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खरे तर झलक दिखला जा या कार्यक्रमाला नेहमीच खूप चांगला टीआरपी असतो. पण यंदाच्या सिझनमध्ये झलक दिखला जा टिआरपी रेसमध्येही खूप मागे आहे. 

Web Title: These are three of the last finalists of the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.